कार व दुचाकीच्या भिषण अपघातात दोन तरुण ठार तर एक गंभीर जखमी

326

कार व दुचाकीच्या भिषण अपघातात दोन तरुण ठार तर एक गंभीर जखमी

वणी : कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वणी -वरोरा मार्गावरील सावर्ला गावाजवळ दि. २८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. दुचाकी वरील एक जण गंभीर जखमी झाला असून कार मधिल प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आकाश गाऊत्रे (२८) व अमन मडावी (२९) अशी या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर रेणू तुमाराम (२७) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हे तीनही युवक शहरातील भिम नगर परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

वरोरा येथे त्यांचे ओळखीच्या व्यक्तीच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला हे तिघेही युवक दुचाकीने गेले होते असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला हे तिघेही गेले होते त्या व्यक्तीचा गेल्या वर्षी झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता असेही बोलले जात आहे. वरोरा येथुन वणी कडे परत येत असताना सावर्ला गावाजवळ त्याच्या दुचाकीला भरधाव कारने समोरासमोर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकी व कारचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. आणि एकाला गंभीर दुखापत झाली आहे. कार चालक व मालकाचे नाव मात्र कळू शकले नाही. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनासथळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. तर मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

advt