ट्रक ची महामार्ग मजुरास धडक

704

ट्रक ची महामार्ग मजुरास धडक

खडसंगी येथील घटना ; जागीच ठार

आशिष गजभिये
चिमूर

तालुक्यातील खडसंगी येथे दुपारी ३ वा. सुमारास भरधाव ट्रक महामार्गावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यास जोरदार धडक दिली.यात कर्मचाऱ्याचा जागीच मृत्य झाला असून सोनू बाबाजी गेडाम(३०) असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

चिमूर तालुक्यात सद्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहेत.यात नव्याने के.पी.सी.एल.प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या कंत्राट कंपनीचे मोजणीचे काम परिसरात सद्या सुरू आहे.यात स्थानिक मजूर अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करीत आहेत.बंदर(शिवापूर)येथील युवक सोनू गेडाम हा सुद्दा मागील काही दिवसांपासून काम करीत होता.
गुरुवारला नियमित सारखा सहकाऱ्यासमवेत तो मोजणीच्या कामासाठी खडसंगी ला आला.दरम्यान दुपारच्या सुमारास मोजणी करीत असताना भरघाव ट्रक ने त्या फरफडकत नेलं.यात त्याच सर्व शरीर अस्ताव्यस्त अवस्थेत झालं व जागीच ठार झाला.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.ट्रक चा ट्रक घेऊन पसार झाला आहे.वृत्त लिहिस्तोवर पोलीस घटनास्थळी दाखल व्हायचे होते.

कुटुंबाला धक्का
सोनू ची आई काही वर्षांपूर्वी वारली वडील तो दोघेच असायचे वडील मातारे असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा भार त्याच्या वर होता त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या वडिलांवर मोठं संकट ओढवल आहे.

कंत्राट कंपनीने मदत करावी
कामावर असताना मजुरांचा मृत्यू झाला आहे.या बाबतीत दै. नवजीवन ने कंत्राट कंपनी प्रतिनिधी शी मजुरांच्या विमा चौकशी माहिती करिता सम्पर्क केला पण होऊ शकला नाही.मृतकाची आर्थिक स्थिती पाहता कँपनी ने कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

advt