वडाळा विभागात साठवण टाकी (संप पीठ) आणि पंपींग स्टेशन उभारण्यास महानगरपालिकेचा सकारात्मक प्रतिसाद!

0
355

वडाळा विभागात साठवण टाकी (संप पीठ) आणि पंपींग स्टेशन उभारण्यास महानगरपालिकेचा सकारात्मक प्रतिसाद!

शिवसेनेच्या पाठपुराव्यास यश…!

मुंबई प्रतिनीधी : महेश कदम
मुबंई वडाळा येथील आर. ए. किडवाई मार्ग येथे पावसाळी पाण्याचा निचरा करण्याकरीता विभागात साठवण टाकी (संप पीठ) आणि पंपींग स्टेशन उभारण्यास महानगरपालिकेचा सकारात्मक प्रतिसाद ! वर्षानुवर्षे मुंबईतील गांधी मार्केट व हिंदमाता या परिसरात पावसाळ्यात सातत्याने पाणी साचून निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचे निवारण करण्याकरिता शिवसेना नेते युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून गांधी मार्केट व हिंदमाता विभागात साठवण टाकी आणि पंपींग स्टेशन उभारले गेले. त्याच धर्तीवर एफ दक्षिण महानगर पालिका कार्यालयाच्या हद्दीतील वडाळा येथील आर.ए.किडवाई मार्ग येथे देखील साठवण टाकी (संप पीठ) आणि पंपींग स्टेशन उभारण्यात यावे, याकरीता आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार, विभाग संघटिका – माजी महापौर सौ. श्रध्दा जाधव यांच्यासह युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे व विभागातील रहिवासी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय यात अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलारासू यांची भेट घेतली. वडाळा विभागातील आर.ए.किडवाई मार्ग येथील सक्कर पंचायत चौक व शिवडी छेद मार्ग येथे पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याचे प्रमाण अधिक असते. अतिवृष्टी झाल्यास दोन मीटरपेक्षा जास्त पाणी या भागामध्ये साचते. ज्यामुळे रहिवासी, पादचारी व प्रवासी यांची गैरसोय होते. ज्याप्रमाणे गांधी मार्केट व हिंदमाता परिसर येथे पावसाळी पाण्याचा निचरा करणेकरीता साठवण टाकी आणि पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्याप्रमाणे वडाळा आर.ए.किडवाई मार्ग येथे साठवण टाकी (संप पीठ) व पंपींग स्टेशन उभारुन पावसाळ्यात येथील रहिवाशांना उद्भवणाऱ्या अडचणीवर प्रभावी उपाय योजना करण्यात यावी, अशी विनंती या भेटीदरम्यान मयुर कांबळे यांच्या मार्फत करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त श्री. पी. वेलारासू यांनी संबंधित अधिकार्यांना त्वरित प्राधान्यक्रमाने सदर कामास प्रारंभ करावा असे सांगून पावसाळ्याच्या आत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी वडाळा विभागात पावसाळ्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पुर्ण काळजी महानगरपालिका घेईल, असे आश्वासन त्यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. वडाळा विधानसभा संघटक राकेश देशमुख, उपविभाग प्रमुख रवि घोले, शाखाप्रमुख हमीद शेख, सफी शेख, यासीन शेख, रौक शेख, उपशाखाप्रमुख मोहम्मद हुसैन यांच्यासह वडाळा-शिवडी विभागातील शिवसेना पदाधिकारी व स्थानिक रहिवासी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here