कोलाम विकास फाउंडेशन चे अध्यक्ष पत्रकार विकास कुंभारे यांचे अपघाती निधन

264

कोलाम विकास फाउंडेशन चे अध्यक्ष पत्रकार विकास कुंभारे यांचे अपघाती निधन

राजुरा : कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे कोलाम विकास फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार विकास कुंभारे हे एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना डॉ. मानवटकर चंद्रपुर येथे भर्ती करण्यात आले. परंतू उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने अखेर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

ते कोलाम बांधवांचे काम आटोपून गडचांदूर वरून राजुरा परतत असतांना चंदनवही जवळ अपघात घडला. यात त्यांना डोक्याला गंभीर मार लागला होता. चंद्रपूरला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

विकास कुंभारे हे वेकोलीच्या सास्ती खुल्या कोळसा खाणीत फोरमन पदावर कार्यरत होते. ते काही काळ सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणूनही काम पहात होते. अल्पावधित पत्रकारिता क्षेत्रात नाव लौकीक मिळवीला होता. त्यांना राजुरा च्या ग्रामीण रुग्णालयात आणले, तिथून त्वरित चंद्रपूर ला डॉ. मानवटकर हॉस्पिटल ला रेफर करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांचेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु‌ अखेर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

advt