वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती महत्वाची : सुधीर मुनगंटीवार

0
500

वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती महत्वाची : सुधीर मुनगंटीवार

निसर्ग सखा च्या चित्रफितीचे उदघाटन

गोंडपिपरी : चंद्रपूर जिल्हयाला वाघाच्या रूपाने वरदान लाभले आहे. ताडोब्यासह जिल्हयात सर्वत्र मोठया प्रमाणावर वाघांचा व वन्यजीवांचा वावर आहे. पण अधामधात मानव वन्यजींवांचा संघर्ष टोकाला पोहचतो.यात कधी वन्यजींवांचा तर कधी मानवांचा बळी जातो. असे प्रकार रोकण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. निसर्ग सखा संस्थेने मानव वन्यजीव संघर्षावर तयार केलेली चित्रफित हि जागृतीचे प्रभावी माध्यम ठरावे असा आशावाद राज्याचे माजी वनमंत्री आमदार सुध्सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

निसर्ग सचाा संस्था व मुंबई येथील पर्यावरण मित्र हंस दलाल यांनी मानव वन्यजीव संघर्षावर एक चित्रफित तयार केली. या चित्रफितीचे उदघाटन करतांना ते बोलत होते. निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे, पर्यावरण मित्र हंस दलाल, नगरसेवक राकेश पुन, सुरज माडुरवार , चेतनसिंह गौर, सुनील फुकट आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणावर होत असलेल्या वन्यजीव मानव संघर्षामुळ वातावरण ढवळून निघाल आहे.सामान्य जिवनावर याचा मोठा परिणाम होत आहे. हा संघर्ष थांबणे दोन्ही घटकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यासाठी निसर्ग सखा संस्था व पर्यावरण मित्र हंस दलाल यांनी जनजागृतीपर चित्रफित तयार केली. वनविभागाव्दारे हा संघर्ष टाळण्यासाठी तयार केलेल्या योजनंाची माहिती सामान्य नागरिकांपर्यत पोहचावी हा उदात्त हेतू घेत हि चित्रफित तयार करण्यात आली. चंद्रपूर जिल्हयातील शोषित खोब्रागडे, रूतूजा गुरूनुले, नाजूका गेडाम, राजू खोब्रागडे, निलेश देशमुख, मुन्ना भगत, गौरव शिरोडकर याच्यासह अनेकांनी उपक्रमात सहभाग दर्शविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here