प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध बचत गटाचा आनंद मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम

0
368

प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध बचत गटाचा आनंद मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम

बाबूपेठ प्रभागातील रणरागिणी, सहेली, सावित्रीबाई फुले, सखी, जिजाऊ, माऊली, श्री संताजी, गायत्री, महाकाली महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा हळदी कुंकू आणि आनंद मेळाव्याचे आयोजन स्थानीक बाबूपेठ येथील शिव मंदिर मध्ये करण्यात आले.

मेळाव्याचे उदघाटक सौ. प्रभाताई वासाडे सामाजिक कार्यकर्त्या, मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सौ. चंदाताई वैरागडे संस्थपाक अध्यक्षा महिला बचत गट, विशेष अतिथी माजी महापौर सौ. संगीताताई अमृतकर, अर्चनाताई चौधरी, योग शिक्षिका स्मिताताई रेबनकर, कार डेकोरेटिव्ह डायरेक्टर मेघनाताई शिंगरू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

प्रथमतः मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. संगीता अमृतकर इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच संघटन करून अगदी आनंदमय वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करणे इतकं सोपं काम नाही, परंतु हे कार्य चंदाताई नी करून दाखविल आणि आमच्या काँग्रेस पक्षासाठी सुद्धा त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते असे आपल्या मनोगतातून सांगितले.

सौ. अर्चना चौधरी यांनी प्रत्येक महिलांनी जीवनात आलेल्या कुठल्याही कठीण प्रसंगाला न घाबरता त्याचा मुकाबला करा निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल असे सांगितले. उदघाटक सौ. प्रतिभा वासाडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम करणाऱ्या सौ. चंदाताई यांच्या नेतृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. सौ. स्मिता रेबनकर यांनी खरच समाजात अस एखाद स्थान असावं जिथं आपल्या महिलांना आशेचा किरण मिळेल आणि ते दुसरं तिसर कुणी नसून आपल्या चंदाताई आहेत असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

सौ. चंदाताई वैरागडे अध्यक्ष पदावरून संबोधित करताना एकूण दहा महिला बचत गटाच्या माध्यमातून दरवर्षी महिलांना सक्षम, आत्मनिर्भय, स्वावलंबी तसेच त्यांच्या अंगी असलेले कला गुण यांना वाव देण्यासाठी आम्ही आनंद मेळावे, महिला मेळावा, वृक्षारोपण रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू कार्यक्रम, स्नेहभोजन, विविध स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आम्ही राबवित असतो. आणि या प्रत्येक कार्यक्रमात महिलांचा सक्रिय सहभाग असल्यामुळेच आम्ही प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करू शकतो. आजच्या घडीला सर्व गट मिळून 700 महिला सदस्य बचत गटात असून केवळ माझ्या प्रामाणिक व्यवहारामुळेच दिवसेंदिवस बचत गटात सदस्य संख्या वाढत आहेत. त्यामुळेच आमच्या महिला बचत गटाच्या संकल्पनेतून बाबूपेठ येथे रणरागिणी महिला पतसंस्था आम्ही सुरू केली आणि तिथं सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद महिलांनी दिला आहे. हे केवळ मी माझ्या बचत गटातील महिलांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच शक्य झाले असे आपल्या मनोगतून व्यक्त केले.

आनंद मेळाव्यात महिलांनी स्वतः तयार केलेले विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले त्याचा उपस्थित असलेल्या महिलांनी मनसोक्त खाद्य पदार्थांचा आनंद घेतला. तसेच महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत बहुसंख महिलांनी सहभाग घेतला.
शेवटी मेळाव्यात सर्व सहभागी बचत गटाच्या सर्व सदस्यांना हळदी कुंकू व भेट वस्तू देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व बचत गटाचे अध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रास्ताविक मीनल खनके यांनी तर संचालन सरोज चांदेकर यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार तेजस्विनी पोडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here