प्रयोगशील शेतकऱ्याची तणनाशक फवारणीची भन्नाट संकल्पना

0
491

नांदा येथील प्रयोगशील शेतकरी किशोर पाटील चौधरी यांचा स्वस्तात मस्त वेगळा प्रयोग.

नितीन शेंडे, आवाळपुर

आपण नेहमी ऐकत असतो की शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केली पाहिजे. आज शेतकरी आधुनिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. शेतीमध्ये सुद्धा शेतकरी नवनविन प्रयोग करू पाहत आहे. असाच एक प्रयोग नांदा येथील प्रयोगशील शेतकरी मा.किशोर पाटील चौधरी यांनी कपासीत तणनाशक फवारणी करतांना कपासीवर तणनाशकाचा फवारा जाऊनये यासाठी खाली तेलाच्या पिप्यांच्या मदतीने केलेली स्वतात मस्त कल्पना केलेली आहे .मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर या प्रयोगाचे मोठ्या प्रमाणावर चर्चा होतानी दिसून येत आहे . किशोर चौधरी पाटलांनी मागील एक आठवड्या पूर्वी आपला हा प्रयोग सुरू केला आणि आता एका आठवड्यानंतर त्याचा वापर करून झालेला फायदा आपण फोटो मध्ये बघू शकतो. आपण ही हा प्रयोग करून बघू शकतो.

             संकल्पना चांगली असून शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून पहावा अशी विनंती हा प्रयोग समोर आनणारे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम निब्रड यांनी केली आहे. अशाप्रकारचे अनेक प्रयोग शेतकऱ्यामार्फत होत असून भारतीय पारंपरिक शेतीला आता आधुनिकरणाची साथ मिळत असून यातून चांगला फायदा होताना दिसून येत आहे.

 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here