विदर्भ स्तरीय आमदार चषकाचे शानदार उद्घाटन

154

विदर्भ स्तरीय आमदार चषकाचे शानदार उद्घाटन

विदर्भ स्तरीय आमदार चषकाचे शानदार उद्घाटन


राजुरा :- आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून राजुरा कल्ब राजुरा द्वारा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुराच्या पटांगणावर आयोजित तीन दिवसीय विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डीचे उद्घाटन शानदार सोहळ्यात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उद्घाटक वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक एस. एस. डे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, दगडी चाळ फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पुजा सावंत,आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू अनिल माडवे, ग्रा. स. शि. प्र. मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष तथा बामणीचे उपसरपंच सुभाष ताजने, सेवा कलश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे, चंद्रपूर जिल्हा कबड्डी महासंघाचे पदाधिकारी सुभाष गौर, दिलीप रामेडवार, सतीश डफले, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष संदीप जैन यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

advt