चंद्रपूर येथे ४ मार्च ला क्लब ग्राऊंडवर सामूहिक विवाह सोहळा

0
518

चंद्रपूर येथे ४ मार्च ला क्लब ग्राऊंडवर सामूहिक विवाह सोहळा

राजुरा : सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळा समिती चंद्रपूर च्या सौजन्याने चंद्रपूर येथे दि. ४ मार्च २०२३ रोजी चांदा क्लब ग्राऊंड वर सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला गेला आहे. जिल्ह्यातील सर्व देवस्थान, न्यास, सेवाभावी सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या सामूहिक उपक्रमा अंतर्गत गरीब, आत्महत्याग्रस्त,आर्थिकदुर्बल (विपन्न), घटस्फोटित,शेतकरी शेतमुजर व इतर सर्वाच्या मुलामुलींच्या विवाहासाठी हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून या विवाह सोहळ्यासाठी वरवधू साठी नावनोंदणी ची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी ठरविण्यात आली आहे.विवाह सोहळ्यात येणाऱ्या वरवधू साठी त्यांनी आपले आधार, जन्म दाखला, रहिवासी दाखला, शेती असेल तर सातबारा, लग्न करीत असल्याचे संमतीपत्र, यापूर्वी लग्न न झाल्याचे शपथपत्र आदी कागदपत्रे ठेवायची असून त्यांना लग्नाच्या मंडपात कपडे, फेटा, ओढणी, अलंकार व गृहउपयोगी वस्तू भेट देत शासकीय नोंदणीकृत प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. यासाठी नुकतेच काल राजुरा नगर परिषद च्या सभागृहात बैठकीचे आयोजन सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पी के करवंदे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले त्त्यात शहरातील गणमान्य मंडळी उपस्थित होती यावेळी सर्व उपस्थितांनी या विवाह सोहळ्यास भरभरून सहयोग करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगरदेवें, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, अॅड मनोज काकडे, कैलाश , रामदासजी वाघदरकर, मसूद अहमद, मडावीजी, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, सतीश धोटे, प्राचार्य वारकड तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here