बस थांब्यावर दिव्यांगांना रोजगार करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करुन द्या निधी आम्ही देऊ – आ. किशोर जोरगेवार

0
316

बस थांब्यावर दिव्यांगांना रोजगार करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करुन द्या निधी आम्ही देऊ – आ. किशोर जोरगेवार

एस टी महामंडळचे व्यवस्थापकिय संचालकांनी घेतली आमदार जोरगेवार यांची भेट

 

दिव्यांगाच्या रोजगारासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यांच्यात काम करण्याची जिद्द आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. एस. टी महामंडळनेही या सेवा कार्यात आपला सहभाग नोंदवत बसचे थांबे असलेल्या स्थानकांवर दिव्यागांना रोजगार स्टॉल उपलब्ध करुन द्यावे अशा सुचना महामंडळाचे व्यवस्थापकीय उपाध्यक्ष तथा संचालक शेखर चन्ने यांना केल्या असुन यासाठी निधीची गरज असल्यास ती आम्ही उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले आहे.

आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांची शासकीय विश्रामगृह येथे महामंडळच्या अधिका-र्यांनी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चे दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केल्या आहे. या बैठकीला महामंडळाचे व्यवस्थापकीय उपाध्यक्ष तथा संचालक शेखर चन्ने, वाहतुक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक यंत्र अभियंता कोलारकर, विभाग नियंत्रक स्मिता सूतवने, विभागीय अभियंता राहुल मोडक, देवानंद पुन्नमवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महामंडळच्या विविध कामांची माहिती घेतली आहे. चंद्रपूर आणि घुग्घुस बसस्थानकाचे संत गतीने सुरु असलेले काम तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. नवीन चंद्रपूर कोसारा येथे बस स्थानकासाठी जागा आरक्षित आहे. येथे चार्जिंग एसटी डेपो ची निर्मिती केल्या जाणार आहे. येथे इलेस्ट्रिक बस सुरु करुन चार्जिंग स्टेशन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अधिका-र्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना दिली. यासाठी निधीची मागणी त्यांनी आ. जोरगेवार यांना केली आहे. याबाबतही आमदार किशोर जोरगेवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सोबतच बस स्थानक असलेल्या ठिकाणी दिव्यागांसाठी स्टाँल उपलब्ध करण्यात याव्येत. या स्टाँलच्या माध्यमातून दिव्यागांना रोजगार मिळेल. तसेच बस स्थानकही स्वच्छ राहतील. या कामात निधीची आवश्यकता असल्यास तो आपण उपलब्ध करुन देऊ असे आश्वासनही यावेळी आमदार किशोर यांनी संबधित अधिका-र्यांना दिले आहे. यावेळी एसटी महामंडळच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here