राजुरा पोलीस स्टेशन येथील प्रभारी निरीक्षकांना हटविण्याची मागणी – सुरज ठाकरे

385

राजुरा पोलीस स्टेशन येथील प्रभारी निरीक्षकांना हटविण्याची मागणी – सुरज ठाकरे

दोन महिन्यांनी आधीच राजुऱ्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बहादूरे हे सेवानिवृत्त झाल्यापासून राजुरा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची खुर्ची रिकामी आहे व त्याचा प्रभारी कारभार हा सहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर यांच्याकडे आहे. तेव्हापासूनच अवैध धंद्यांना उधाण आल्याचा आरोप सुरेश ठाकरे यांनी केला. तसेच सोशल मीडिया वर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याची व्हिडिओ क्लिप प्रसार माध्यमांना व्हायरल केली आहे. याचाच आधार घेत राजुरा येथे तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच पोलीस स्टेशनमध्येच जुगार खेळण्याचे धाडस करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सहायक पोलीस निरीक्षक दरेकर यांच्या देखील निलंबनाची मागणी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री छेरिंग दोरजे व पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांना निवेदनातून केली आहे.

राजुरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसावरती धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप यापूर्वी देखील अनेकदा विविध संघटनांनी व नेत्यांनी केला आहे. परंतु सुरेश ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकत पोलीस प्रशासनच पोलीस स्टेशन मध्येच जुगार खेळत असल्याचा पुरावाच दिला असल्याने पोलीस स्टेशन राजुरा वर लागत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना दुजोरा मिळाला आहे. जर पोलीस कर्मचारी अशा पद्धतीने कायदा मोडत असतील तर यांच्याकडून कायद्याचा संरक्षणाची अपेक्षा कशी करायची, असा अहवाल सर्व नागरिकांनी उचलून धरला आहे. व राजुरा पोलीस स्टेशन मधील अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर अधीक्षक कारवाई करतील की मेहरबानी दाखवतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

advt