आ. भांगडीया यांनी घेतला भीसी शहर व परिसरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

0
564

आ. भांगडीया यांनी घेतला भीसी शहर व परिसरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

स्वखर्चातून भीसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर व सॅनिटायझर केले उपलब्ध

चिमूर, आशिष गजभिये : विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया भांगडीया यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र भीसी येथे भीसी शहर व परिसरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. भीसी व परिसरातील परिस्थिती जाणून घेत प्रशासनाला विविध सूचना दिल्या.

कोरोनाची तिसरी लाट यायच्या आधीच कोरोनावर नियंत्रण ठेवण्याकरिता आरोग्य प्रशासनाने पूर्वतयारी ठेवून व सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रामुख्याने ऑक्सिजन सेंट्रलाईझ सिस्टीम चा अवलंब करून नेहमी करिता 10 बेड्स उपलब्ध करण्यात यावे, अँटीजन टेस्ट सेंटर नेहमीकरिता सुरू ठेवण्यात यावे त्या अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करण्यात येईल, कोरोना उपचारासंदर्भात लागणारे औषधे व प्रामुख्याने रेमडीसीविर इंजेक्शन्स उपलब्ध करण्यात यावे. स्थगित असलेले कोरोना लसीकरण पुन्हा पूर्ववत करून वेगाने लसीकरण होईल याकडे लक्ष देण्यात यावे. अश्या विविध सूचना देण्यात आल्या.

त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र भीसी येथे प्राणवायू ची पातळी कमी असणाऱ्या कोविड-१९ रुग्णांच्या उपचाराकरिता ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ची कमतरता भासत असतांना तात्काळ उपलब्ध करावे अशी विनंती आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्याकडे येत होती या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी स्वखर्चातून 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स त्वरित उपलब्ध करून दिल्या. आरोग्य प्रशासनाच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका कष्टी तात्काळ कार्यवाहीबाबत आ. बंटीभाऊ भांगडीया यांचे विशेष धन्यवाद व आभार मानले!

या बैठकीस प्रामुख्याने भाजपा जेष्ठ नेते डॉ. श्यामजी हटवादे, मा. राजुपाटील झाडे, मा. राजूभाऊ देवतळे, गोपालजी बलदुवा, लीलाधरजी बन्सोड, तेजने सर, भाजपा युवा नेते समीरभाऊ राचालवार, प्रदीप कामडी, देवा मुंगले, विनोद खेडकर, राजू बानकर, रवी लोहकरे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित होते. तसेच, प्रशासनाच्या वतीने अधिकारी चिमूर संकपाळ, चिमूर चे तहसीलदार नागटिळक, आरोग्य अधिकारी भीसी डॉ. प्रियंका कष्टी, अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here