बल्लारपूर येथील नंदिनी प्रदीप जिवतोडे हिची राष्ट्रीय रोलर हॉकी स्पर्धेत निवड

172

बल्लारपूर येथील नंदिनी प्रदीप जिवतोडे हिची राष्ट्रीय रोलर हॉकी स्पर्धेत निवड

 

 

बल्लारपूर/रोहन कळसकर : बल्लारपूर येथील मांऊड स्पोर्ट विद्यालयात शिक्षण घेत असलेली कु. नंदिनी प्रदीप जिवतोडे यांची 60 व्या राष्ट्रीय (रोलर स्केटिंग) हॉकी स्पर्धे करीता निवड झालेली आहे.
या पुर्वी त्यांनी चंदीगड येथील 59 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत सहभाग घेतला आहे . बल्लारपूर पेपर मिल येथे ठेकेदारी मध्ये कामगार म्हणून असलेल्या माधुरी प्रदीप जिवतोडे यांची ती कन्या आहे. माधुरी प्रदीप जिवतोडे यांनी आपल्या पत्नी यांच्या निधनानंतर आपल्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी व खेळण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करत असते.
कु. नंदिनी प्रदीप जिवतोडे यांना प्राचार्य ब्रदर्स ॲथोनी व एनआएस चे क्रिडा संकुल चे प्रशिक्षक सुमित बुटले यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते. कु. नंदिनी प्रदीप जिवतोडे हे आता येणाऱ्या 11 डिसेंबर पासून सुरू होत असलेल्या बैगलोर येथे राष्ट्रीय रोलर हॉकी स्पर्धे साठी उपस्थित राहणार आहे.

advt