संविधान दिनानिमित्य आवाळपुरात विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन

220

आता तरुणाईला वेध स्पर्धा परीक्षेचा…

संविधान दिनानिमित्य आवाळपुरात विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन

संविधानाचे रक्षण करणे, ही काळाची गरज-युवा वक्ते अनिकेत दुर्गे

 

 

बिबी : संविधानदिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती आवाळपूर यांच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला समाजातील युवा वर्गानी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धा परीक्षेसोबतच युवा वक्ते अनिकेत दुर्गे चंद्रपूर यांचं जाहीर व्याख्यान ठेवण्यात आले होते.यावेळी संविधान दिनी सामान्यज्ञान स्पर्धा व 27 नोव्हेंबर ला युवा वक्तृत्व स्पर्धा व गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी उदघाटन सोहळ्यात विचारमंच्यावर उदघाटक म्हणून अल्ट्राटेक चे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तथा ग्रामपंचायत आवाळपूर चे विद्यमान सदस्य विकास दिवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा वक्ता अनिकेत दुर्गे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आवाळपूरचा सरपंचा प्रियंका दिवे,उपसरपंच बाळकृष्ण काकडे, ग्रा.प.सदस्य सुरेश दिवे,बंडुजी कवाडे, माजी सरपंच लटारी ताजने,शारदाताई मोहुर्ले, वैभव प्रभाकरावजी दिवे, कनिष्क ताकसांडे,संदीप दवणे, भाविक उमरे, छायाताई कवाडे, किशोर निमसटकर, बाळू बुचुंडे, भालचंद्र मून, पुरुषोत्तम कातकर हे सर्व उपस्थित होते. यावेळी युवा वक्ता, अनिकेत दुर्गे यांनी उपस्थित गावाकऱ्यांना मोलाचा उपदेश केला. संविधानाचे रक्षण करणे, ही काळाची गरज आहे. हे पटवून सांगितले, तर उदघाटनीय भाषणात विकास दिवे बोलताना म्हणाले कि, अशा कार्यक्रमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा विचार वाढीस लागत असतो, अशाच प्रसंगातून समाजात, माणसामाणसात मैत्रीचे, बंधुभावाचे घट्ट नाते निर्माण होत असते, म्हणूनच अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे, समाजासाठी, गावासाठी फार गरजेचे झाले आहे. अशा विधायक, समजोपयोगी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकाचे अभिनंदन केले. यावेळी युवा वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती,परिसरातील युवा वर्गानी विविध स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. सामान्यज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक नितीन रमेश शेंडगे आवाळपूर, द्वितीय सुरज दुर्गे आवाळपूर तर तृतीय शंतनू कांबळे जीवती यांनी मिळविला. युवा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक दिक्षा नवीन वाघमारे,अंतरगाव द्वितीय क्रमांक शंतनू कांबळे, जीवती तर तृतीय क्रमांक भूमिका हरबडे गडचांदूर यांनी पटकविला. गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक माही नवले नांदा फाटा, द्वितीय क्रमांक योगेश सोंडवले चंद्रपूर व तृतीय क्रमांक दीपा प्रसाद आवाळपूर हे विजयाचे मानकरी ठरले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणय निमसटकर यांनी केले. प्रस्तावना बादल दिवे यांनी केली तर उपस्थित पाहुण्यांचे आभार सुवर्णा कांबळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सुजित उमरे, गणेश कातकर, सोनू धोटे, गौतम जुमळे,अमित पडवेकर, सुरज बलवीर, आतिश शिलारकर, ललित उमरे,दीपक बंदूरकर, पिंटू कांबळे, प्रदीप वनकर,निकेश वनकर, गोलू मालेकर,नवनीत उमरे, कुणाल ठेंगरे, पियुष कुडवेकर यांचे सहकार्य तर अक्षय माणुसमारे व नितीन शेंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

advt