विदर्भवादी नेते बाबाराव मस्की यांचा जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

247

विदर्भवादी नेते बाबाराव मस्की यांचा जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

चंद्रपूर, 28 ऑक्टो. : विदर्भवादी नेते बाबाराव मस्की यांनी आज वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला. बाबाराव मस्की यांनी टॉवर वर सपत्नीक चढून तालुक्यातील प्रश्न आणि वेगळया विदर्भ राज्यासाठी वारंवार आंदोलन केले. तसेच गळ्यात लोखंडी साखळी टाकून वेगळया विदर्भा करीता सपत्नीक महाराष्ट्र आणि तेलंगणाचे दौरे केले. ते जांबुवंतराव धोटे नंतर वेगळया विदर्भाची हाक देणारे नेते आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी मा. राजेश भाऊ बोरकर, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) मा. भूषण भाऊ फुसे, जिल्हाध्यक्ष (पूर्व) मा. पुराणिक गोंगले, महिला जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकर, महिला तालुका अध्यक्ष चंद्रपूर तनुजा ताई रायपुरे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष मा. बंडूभाऊ ठेंगरे, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष मा. डॉ. प्रकाश भाऊ तोहगावकर, राजुरा तालुका प्रभारी मा. रमेश भाऊ लिंगमपल्लीवार यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

advt