भाऊ म्हणून आशाताईंच्या पाठीशी सदैव उभा राहिल – आ. किशोर जोरगेवार

0
396

भाऊ म्हणून आशाताईंच्या पाठीशी सदैव उभा राहिल – आ. किशोर जोरगेवार

आशाताईंनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सोबत साजरी केली भाऊबीज

 

आशा वर्कर यांचे कार्य कौतुस्पद राहिले आहे. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतांनाही ते आपले कर्तव्य उत्तमरित्या पार पाडत आहे. कोरोना काळात त्यांनी दिलेली सेवा समाज कधिही विसरणार नाही. एक लोकप्रतिनीधी आणि या ताईंचा भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिल अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

आज बुधवारी भाऊबीज निमित्त आशा वर्कर यांनी कार्यालयात येऊन आमदार किशोर जोरगेवार यांना औक्षवंत करत ओवाळणी करुन भाऊबीज साजरी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनीही भाऊ म्हणून त्यांना आर्शिवाद देत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे म्हटले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे, आशा देशमुख, करणसिंह बैस, नकुल वासमवार यांच्यासह आशा वर्कर उपस्थिती होत्या.
समाजात आशा वर्कर यांचे विशेष स्थान आहे. शासनाचे काम त्या प्रमाणीकपणे करत आहे. विशेषतः कोरोना काळात त्यांनी दिलेली धाडसी सेवा कधीही विसरली जाऊ शकणार नाही. घरची कामं उरकून त्यांना कामाच्या ठिकाणी पोहचावं लागतं. कधी लसीकरणाची ड्युटी तर कधी गावात जाऊन जनजागृती करण्याची मोठी जबाबदारी त्या उत्तम रित्या पार पाडत आहे. असे असतांनाही त्यांच्या वेतनासह ईतर अनेक अडचणी आहे. याची मला जाणही आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. आज भाऊबीज निमित्त औक्षवंत करुन तुम्ही भाऊ बहिणीचे अतूट नाते जपले आहे. दरवर्षी न विसरता आपण रक्षाबंधन आणि भाऊबीज हा भाऊ बहिणीचा सण माझ्यासोबत साजरे करता. मी सुध्दा भाऊ म्हणुन सदैव तुमच्या पाठीशी ठाम पणे उभा राहिल अशा शब्द यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आशाताईंना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here