जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे टक्केवारीमुळे स्वस्त धान्य दुकानदार कमिशनपासून वंचित
स्वस्त धान्य दुकानदारच उपाशी राहणार तर जनतेला काय सेवा देणार -सुनिल मुसळे
जनआंदोलन छेडण्याचा आम आदमी पार्टीचा इशारा
चंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानदारांचे केंद्र शासनाचे सप्टेंबर २०२१ पासूनचे थकीत कमिशन व राज्य शासनाचे माहे मे २०२१ चे कमिशन थकीत आहेत. आता दिवाळी तोंडावर आहे. मात्र, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कमीशन खोरीमुळे स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशन मिळण्यास विलंब होत आहे. हि बाब अतिशय गंभीर असून, तात्काळ कमिशन अदा करण्यात यावे, अन्यथा याविरुद्ध जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना सोबत घेऊन जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने व राज्य सरकारद्वारे मोफत धान्य वाटप यंत्रणा स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत राबविली जाते. मात्र या योजनेच्या थकीत कमिशनमुळे स्वस्त धान्य दुकानदारांची दिवाळी अंधकारमय होण्याची शक्यता आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता युद्ध पातळीवर कार्य केले. सामाजिक जाणीव ठेऊन केलेले हे त्यांचे कार्य उल्लेखनिय आहे.
शासनाने सर्वांची दिवाळी गोडपणे साजरी होण्यासाठी दिवाळी धान्य किट वितरण करण्याची यंत्रणा सुद्धा स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून करण्याची घोषणा केली. पण स्वस्त धान्य दुकानदारांच्या दिवाळीचे काय ? लोकांची दिवाळी गोड करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर अन्याय होत आहे. थकीत वेतन न मिळाल्यामुळे दिवाळी अंधकारमय जाण्याची शक्यता आहे. नविन दिवाळी कीट फक्त मूल तालुका वगळता कुठेही देण्यात आलेली नाही.
दिवाळी तिनं दिवसांवर आली असताना सुद्धा जनतेला वाटप न होने हि गंभीर बाब आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबत निष्पक्ष चौकशी करून शासनाद्वारे जमा केलेला निधी भ्रष्टाचार न करता वाटप करावा.
या प्रकरणाची योग्य चौकशी करुन स्वस्त धान्य दुकानदारांना थकीत वेतन तात्काळ द्यावे, अन्यथा याविरुद्ध जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे युवा जिल्हाध्यक्ष
मयुर राईकवार शहर सचिव राजु कुडे घुग्गुस शहराध्यक्ष अमीत बोरकर शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे झोन अध्यक्ष रहेमान खान वार्ड अध्यक्ष पवन प्रसाद तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.