विहिरगाव नाल्यातून भरदिवसा रेतीचा उपसा

0
479

विहिरगाव नाल्यातून भरदिवसा रेतीचा उपसा

महसूल प्रशासन मेहेरबान असल्याची चिन्हे

 

राजुरा : विहिरगाव लगतच्या नाल्यात पावसाच्या दमदार एंट्रीने मोठ्या प्रमाणात रेतीसाठा जमा झाला आहे. याकडे परिसरातील ट्रॅक्टर मालकांनी आपला मोर्चा वळविला असून भरदिवसा रेतीचा उपसा बिनबोभाटपणे सुरू आहे. मात्र महसूल विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने खुद्द महसूल विभागच या रेती चोरट्यांवर मेहेरबान आहे की काय…? असे चित्र दिसून येत आहे.

विहिरगाव येथे तलाठी कार्यालय असून सुद्धा संबंधित कर्मचारी यापासून अनभिज्ञ असल्याने महसूल विभागाचा आशीर्वाद असण्याची शक्यता बळावली आहे. या रेती तस्करांनी अक्षरशः नाल्यात धुडगूस घालत रेती साठ्याचा वारेमाप उपसा करत नाला ओरबाडून टाकला आहे.

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रेती तस्करीमुळे नाल्याच्या व एकंदरीत पर्यावरणाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरदिवसा होत असलेली रेती तस्करी महसूल विभागाच्या निदर्शनास येत नसल्याने संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच संशय निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here