आप चा प्रयत्नाला मिळाले यश

0
435

आप चा प्रयत्नाला मिळाले यश

कामगारांनी मानले राजु कुडे यांचे आभार

चंद्रपूर मनपाच्या बगीचा सफाई कामगारांना मंजुर दर प्रति दिवस  520 रुपये चा ऐवजी केवळ 300 रुपये मागील 3 वर्षापासून दिले जात असून करोडो रुपयांची अफरा तफर केली जात असल्याची तक्रार संबधीत कामगारांनी आप चे राजू कुडे यांचे कडे दिली असता त्यांनी गरीब मोल मजुर सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता सतत पाठवुरावा केला. यावरती सबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांना आप तर्फे विचारणा केली असता उडवा उडविची उत्तरे दिली जात होती.

यासंदर्भात  सहाय्यक कामगार आयुक्त यांचाकडे आम आदमी पार्टी च्या शिष्ट मंडळाने तक्रार दिली असता त्यांनी संबधित अधिकारी यांना कामगार आयुक्त तर्फे स्पष्ट निर्देश देत कामगाराचे वेतन वाढवणे आणि त्यांना कामावरून कमी करु नये असे आवाहन केले होते.  दिनांक 20 सप्टेंबर ला 12 वाजता कामगार विभागात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने आज चा बैठकीत आपचे शहर सचिव राजु कूडे यांनी कामगारची बाजू मांडत कामगारांना कायद्या अंतर्गत किमान वेतन देण्यात यावा, आठवड्यातून एकदा पगारी सुट्टी देण्यात यावी, पगाराचा आधी वेळेवर पेमेंट स्लीप देण्यात यावी, कामावर लागणारे साहित्य कंत्राटदाराने पुरवावे, नविन कंत्राट मंजूर होत पर्यंत कोणत्याही कामगारांला कामावरून कमी करू नये. अश्या 5 ही मागण्या आणि अटी संबधीत कंत्राटदार आणि मनपा चे अधिकारी श्री हजारे यांनी  मान्य केले.  यामुळे सर्व कामगारांनी आप चे शहर सचिव राजू कुडे  आणी आम आदमी पार्टी चे आभार मानले. या संदर्भात सबंधित ठेकेदार यांनी चुकीचा पध्दातीने पेमेंट करून कामगारांची फसवणूक केली असून त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही तसेच आतापर्यंत ची नुकसान भरपाई सुध्दा घेतली जाणार असल्याचे आपचे राजु कूडे यांनी म्हंटले आहे.

यावेळेस आपचे शहर सचिव राजू शंकरराव कुडे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, झोन संयोजक रहेमान खान, राजेश चेडगुलवार, सिकंदर सागोरे, कृष्णा जी सहारे, अजय बाथव, अनुप तेलतुंबडे, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे,  अश्रफ सय्यद, सुनील सदभैय्या, चंदु माडुरवार, भिमराज बगेसर, विनोद रेब्बावार, संदिप रायपुरे, तसेच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि बागीचा सफाई कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here