बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीची बैठक संपन्न

0
512

बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीची बैठक संपन्न

 

काल दिनांक 17/9/2022 रोज शनिवारला वेळ दुपारी एक वाजता वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूर ची बैठक शासकीय विश्रामगृहात मा. मधूभाऊ ऊराडे निरिक्षक बल्लारपूर तालुका यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हा सचिव सूप्रिया चंदनखेडे तथा बैठकीचे आयोजक धर्मेन्द्र गायकवाड, जेष्ठ कार्यकर्त्यां सत्यभामा भाले, अध्यक्षा वंदना तामगाडगे, डॉ. अनिल बोम्मावार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

बैठकीत वंचित महिला आघाडी च्या अध्यक्षा वंदना तामगाडगे, उपाध्यक्षा रेखाताई मेश्राम, उपाध्यक्षा आशाताई भाले, भारतीय बौद्ध महासभा चे पंचशील वेले, प्रतिभा खेकारे, मोनाली चव्हाण इत्यादी नी मार्गदर्शन केले.

सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिना निमित्त शब्द सुमनांनी आदरांजली वाहित पक्ष प्रमूख बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्वाचे असून ते विचार जनमानसात पोहोचवू, अकोला पॅटर्न बल्लारपूर शहरात रुजवू, असे मत महिला वक्त्यानी व्यक्त केले. तर ओम रायपूरे, प्रभुदास देवगडे, उमेश कडू यांनी ही मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मधूभाऊ ऊराडे यांनी उपस्थित पन्नास महिलांना त्यांच्या म्हणण्यानुसार “जैसा बोले तैसा चाले” म्हणींचा अर्थबोध करीत महिलाना पक्ष प्रबळीसाठी कामास लागण्यास सांगीतले. आभार प्रदर्शन आशाताई भाले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here