चिमुकल्यांचा बहारदार नृत्याने आवाळपुरकर मंत्रमुग्ध

0
863

चिमुकल्यांचा बहारदार नृत्याने आवाळपुरकर मंत्रमुग्ध

विदर्भ मस्कऱ्या गणेश मंडळ तर्फे नृत्य स्पर्धेचे आयोजन

 

 


आवाळपूर : तीन वर्षाच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून आवाळपूर येथील विदर्भ मस्कऱ्या गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. पहिल्या वर्षाचे औचित्य साधून विदर्भ मस्कऱ्या गणेश मंडळाच्या वतीने नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते.परिसरातील अनेक गावातील स्पर्धकांनी या नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये विविध एकल व समूह नृत्य सादर करण्यात आले. अनेक चिमुरड्यांचा बहारदार नृत्याने प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्पर्धेत प्रथम क्रमांक गडचांदूर येथील स्पर्धक बॉबी यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक आर व्ही ग्रुप नांदाफाटा, तृतीय क्रमांक एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल बिबीची विद्यार्थिनी तृप्ती गव्हाने हिला तर प्रोत्साहन पर पारितोषिक चार वर्षीय चिमुरडी काव्या डाहूले हिला देण्यात आला. हारून सिद्दीकी यांच्या आर्केस्ट्राने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांचा संचाने एकापेक्षा एक सदाबहार गाणे गाऊन कार्यक्रमात रोमांच निर्माण केला.कार्यकमाला उदघाटक म्हणून गावचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे व ग्रामपंचायत सदस्य विकास दिवे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून सरपंच प्रियांका ताई दिवे, बादल दिवे, प्रशांत नवले, हारून सिद्दीकी, तर परीक्षक म्हणून सुशील तेलंग व निशा भोयर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व सूत्रसंचालन संचालन नितीन शेंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनंता निब्रड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ मस्कऱ्या गणेश मंडळाचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व आवाळपूरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here