पंचायत समिती च्या हलगर्जीपणामुळे शिक्षिका आर्थिक अडचणीत…

0
812

पंचायत समिती च्या हलगर्जीपणामुळे शिक्षिका आर्थिक अडचणीत…

 


पंचायत समिती वरोरा अंतर्गत कार्यरत विषय शिक्षिका श्रीमती आशा कारवटकर यांनी भविष्य निर्वाह निधी खात्यातून अग्रीम रक्कम मिळण्यासाठी मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे 2 मे 2022 रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत अर्ज सादर केला.
भविष्य निर्वाह निधी खात्यातून अग्रीम मागणी अर्ज प्राप्त झाल्यावर उप मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी 7 जून 2022 रोजी 21 लाख 50 हजार रुपये च्या आर टी जी एस गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला.

तीन महिने होउनही भ. नी. नी. अग्रीम रक्कम मंजुर का झाली नाही असे श्रीमती आशा कारवटकर यांनी प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर कडे विचारणा केली असता मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडून 7 जून 2022 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्याकडे आर टी जी एस द्वारे रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
त्याप्रमाणे 3 ऑगस्ट 2022 रोजी श्रीमती आशा कारवटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे निवेदन सादर करून दोन महिन्यापासून गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्या खात्यावर रक्कम जमा होउनही रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली नाही.

त्यामूळे 21 लाख 50 हजार रुपये यावर दोन महिन्यांचे व्याज देण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या 24 मे 2022 च्या निवेदनाची दखल घेऊन भ. नि. नि. खात्याची अग्रीम व अंतिम रक्कम डायरेक्ट शिक्षक/ कर्मचारी यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश निर्गमित केले असुन मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तात्काळ अमलबजावणी केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर या जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये रुजू झाल्या पासून अनेक कर्मचारी/शिक्षक हिताचे निर्णय घेऊन समस्या निवारण करीत असतात. एवढंच नव्हे तर वेळोवेळी पाठपुरावा करून दर महिन्याला आढावा घेतात.
परंतू पंचायत समिती स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद चंद्रपूर यांच्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच श्रीमती आशा कारवटकर यांचे दोन महिन्यापासून भ. नी. नि. रक्कम गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्या खात्यावर प्रलंबीत आहे.

पंचायत समिती वरोरा येथिल दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाई करुन दोन महिन्यांचे बँकेच्या व्याज दरानुसार संबधित शिक्षिकेला व्याज देण्यात यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here