लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीतर्फे कामगारांना व परिसरातील नागरिकांना बूस्टर डोज

0
411

लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीतर्फे कामगारांना व परिसरातील नागरिकांना बूस्टर डोज

जिल्हाधिकारी अजय गुल्‍हाने यांच्या आदेशानुसार सर्वांना बूस्टर डोस मिळणार मोफत

 

१५ जुलैपासून विशेष मोहीम सुरू असल्याने घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्याने दि. ५ व ६ ऑगस्ट २०२२ रोजी दोन दिवस बूस्टर डोज लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून स्टाफ, स्थायी व अस्थायी सर्व शेकडो कामगार ,कर्मचारी व तसेच परिसरातील नागरिकांना बूस्टर डोज देण्यात आले.

कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.रितेश वाठ आपले मनोगत व्यक्त करत कामगाराना तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोनाशी (Covid-19) लढा देत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा चढता आलेख दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांसाठी ‘बूस्टर डोस’ (Booster Dose) मोफत देण्याची घोषणा केली आहे. देशात 75 दिवसांसाठी ‘कोविड लस अमृत महोत्सव’ राबवण्यात येणार आहे. या 75 दिवसांत 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे.

यावेळी घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे के.बी.झाडे, गायकवाड, अनुराधा हागे, शर्मा,लाॅयड्स मेटल्स कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.रितेश वाठ, सहकारी धनंजय सांगुळले, कंपनीच्या युनिटचे प्रमुख श्री. संजय कुमार, प्रकल्प प्रमुख श्री. दिनेशकुमार पाटीदार, एच.आर विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी, ऑपरेशन विभागाचे उपाध्यक्ष गुणाकर शर्मा,तरुण केसवानी, प्रमोद नाकाडे,किसन हिंगाने,अंकुर पोरस ,कामगार, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here