चामोर्शी तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाने कही खुशी कही गम.

0
465

चामोर्शी तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाने कही खुशी कही गम.

चामोर्शी तालुक्यातील नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमुळे काहीना लॉटरी लागल्याचा आभास झाला तर काहींच्या तोंडचा घास हिरावला गेला.
सोमवार दि. ८ तारखेला 54 ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची कार्यवाही पार पडली त्यात अनुसूचित क्षेत्रांतर्गत येत असलेल्या २१ ग्रामपंचायतीपैकी गिलगाव,पावीमुरांडा, मुरमुरी, येडाणुर, सगणापुर, सोनापूर, रेगडी,जयरामपुर,मुधोलीचक नं. २,कुनघाडा माल, भाडभिडी बी. या ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाले आहे. चौडमपल्ली, कुरूड,मक्केपल्ली माल, मारोडा,मुधोलीरिठ, कुथेगाव, माडेआमगाव, पेटतळा,ठाकरी,इल्लूर या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती सर्वसाधारण साठी राखीव आहे.
अनुसूचित क्षेत्राबाहेरील ५४ ग्रामपंचायती आहेत यातील भाडभिडी मो. कोनसरी,रामाळा अनुसूचित जाती महिला साठी राखीव झाले. फराडा व घोट अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी राखीव आहेत. कळमगाव,विसापूर रै, मूरखळा चक अनुसूचित जमाती महीलासाठी राखीव आहेत. चाकलपेठ, वालसरा अनुसूचित जमाती सर्वसाधारण साठी राखीव आहे. अनखोडा, भेंडाळा, दुर्गापूर, मक्केपल्ली चक नं. १, लखमापूर बोरी, कान्होली,मार्कंडा कं,येथे नामाप्र महिला करिता राखीव आहे. वाकडी, मूरखळा माल, जामगिरी, विक्रमपूर,नवरगाव, माल्लेरमाल, चंदनखेडी या नामाप्र सर्वसाधारण साठी राखीव झाले आहेत. कुनघाडा रै. हळदवाही, फोकुर्डी, तळोधी मो. आष्टी, आमगाव म. हळदी माल, अड्याळ,वाघोली, वेलतुर तुकूम, दोटकुली, सिमुलतला, मुधोली तुकूम, वसंतपूर या ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. मोहर्ली मो. गौरीपुर, घारगाव, नवेगाव माल, सुभाषग्राम, सोमनपल्ली, वरुर,चापलवाडा, नवेगाव रै., नेताजी नगर, विकासपल्ली, बहाद्दूरपुर,वायगांव, गणपुर रै., केली या ग्रामपंचायती मध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here