माउंट कॉन्व्हेन्ट व सरस्वती विद्यामंदिर स्कूल नकोडा येथील विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करा : आम आदमी पार्टी घुग्घुस

0
383

माउंट कॉन्व्हेन्ट व सरस्वती विद्यामंदिर स्कूल नकोडा येथील विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करा : आम आदमी पार्टी घुग्घुस

 

चंद्रपूर जिल्ह्यातील स्थित घुग्घुस हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते इथेच असलेल्या एसीसी सिमेंट कंपनी शेजारील स्थित असलेल्या माउंट कॉन्व्हेन्ट स्कूल व सरस्वती विद्यामंदिर स्कूल नकोडा इथे शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी केली. यामागच कारण असं की दिवसेंदिवस एसीसी सिमेंट कंपनी द्वारे होणाऱ्या प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणामध्ये वाढतच चाललेला आहे आणि यामुळे कंपनी शेजारील शाळेमध्ये शिकत असलेल्या लहान लहान मुलांना वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. हि बाब आम आदमी पार्टी घूग्घुस च्या लक्षात येताच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे लवकरात लवकर शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी व सोबतच कंपनी मुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य उपचार करण्यात यावे व याचा संपूर्ण खर्च एसीसी सिमेंट कंपनी द्वारे करण्यात यावा जर ही आरोग्य तपासणी येत्या पंधरा दिवसांमध्ये करण्यात आली नाही तर आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here