‘बेस्ट बिफोर’ मद्य विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा…

0
947

‘बेस्ट बिफोर’ मद्य विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा…

 

राजुरा : स्थानिक बल्लारपूर रोड स्थित बार मधून एक्सपायरी झालेली (बेस्ट बिफोर) बिअर विक्री करून मद्यपींच्या जीवाशी जीवघेणा प्रकार चालत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याची रितसर तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग चंद्रपूर यांच्याकडे दिली असता राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने सदर परवानाधारक मद्य विक्रेत्यांवर कारवाई केली.

राज्य उत्पादन विभाग चंद्रपूरच्या अधीक्षक यांनी स्थानिक निरीक्षक यांना एक्सपायरी मद्य विक्री व ‘ड्राय डे’ दिवशी नियमबाह्य होत असलेली मद्य विक्री यावर कारवाई करून अहवाल सादर करण्यास बजावले. या अनुषंगाने स्थानिक निरीक्षक यांनी संबंधित मद्यविक्रेत्या परवानाधानकावर कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here