जगविण्यासाठी प्रशासन-गावकरी धावले, काळाने हिरावले

0
925

जगविण्यासाठी प्रशासन-गावकरी धावले, काळाने हिरावले

अखेर त्या तरुणाची जिवन-मरणाची झुंज संपली

प्रशासनात व गावकऱ्यात हळहळ

 

 

कोठारी/राज जुनघरे
मेंदूज्वराने ग्रस्त असलेल्या तोहोगाव येथील त्या तरुणावर उपचारासाठी घनदाट जंगलातून आणि महापूरातून प्रशासन व गावकऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. अडथळे पार करीत चंद्रपूर ग्रामीण रुग्णालय नंतर नागपूर येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु त्या तरुणास काळ वाचवू शकला नाही. अखेर त्याची जिवन मरणाची लढाई संपली. रात्री बारा वाजता त्याची प्राणज्योत मालवली. मृत्यूची बातमी गावात पसरली आणि रात्रीत गाव जागा झाला. त्या युवकासाठी गाव हळहळला तर प्रशासनातील तर तहसीलदार व पोलिसांनाही दुःख आवरता आले नाही.

 

ही दुर्दैवी घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगावातील आहे. विदर्भात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली. गावाला पूराच्या पाण्याने वेढा घातला त्यात साहिल कालिदास वाघाडे या तरुणास मेंदूज्वर जडला. गावातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आजार गंभीर असून पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला दिला. परंतु पुराच्या पाण्यातून कसे न्यायचे विचार करीत असताना गावातील उपसरपंच फिरोज पठाण यांनी तहसीलदार के.डी.मेश्राम यांना कळविले व प्रशासनाची मदत मागीतली. गोंडपिपरी तालुका प्रशासन, कोठारी पोलिस व कन्हाळगाव वनविभागाने त्या युवकास नावेने, घनदाट जंगलातून रुग्णवाहिकेने संघर्ष करीत चंद्रपूर रुग्णालयात दाखल केले. स्थानिक रुग्णालयात उपचार होणार नाही. असे डॉक्टरांनी सांगताच आणि अळसर ठरलेल्या मार्गाचा विचार करण्यात संपूर्ण रात्र निघून गेल्याने युवकावर तात्काळ उपचार होऊ शकला नाही. तरी प्रशासनाच्या अथक परिश्रमाने त्यास उपचारासाठी रवाना केले.

 

गावकऱ्यांनी त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करु लागले. प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. तरुणाची संकटाशी व जिवन मरणाशी झुंज सुरू होती. नशीब परिक्षा घेत होते. अखेर रात्री बारा वाजता त्याचा मृत्यू झाला. गावात वृत पसताच हळहळ व्यक्त करीत शोक व्यक्त करु लागले. हि माहिती तहसीलदार व ठाणेदारांना समजताच त्यांनाही दुःख अनावर झाले. कुटूंबात एकुलता एक मुलाचा असा मृत्यू झाल्याने वाघाडे परिवारावर दुखाचा डोंगर कोसडलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here