घुग्घुस येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीं यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व साहित्य वाटप

0
465

घुग्घुस येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीं यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व साहित्य वाटप

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी एकसंघ भारताचे निर्माते – देवराव भोंगळे

 

बुधवारी ६ जुलै रोजी घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात एक देश मे दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे चा नारा देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी शहर घुग्घुसतर्फे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जनसंघाचे संस्थापक, थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला भाजपाचे विवेक तिवारी यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हातठेला चालकांना व भाजीपाला विक्रेत्यांना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कुलजारचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मूखर्जी यांनी एकसंघ भारत निर्माण करण्याचे काम केले. कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारत एक देश आहे आणि कश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक आहे. एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे असा नारा बुलंद करनारे होते त्यांनी एकसंघ भारतासाठी लढा दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभर विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पं.स. उपसभापती निरिक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे राजकुमार गोडसेलवार, सिनू इसारप, साजन गोहने, पूजा दुर्गम, वैशाली ढवस, सुचिता लुटे, प्रकाश बोबडे, विनोद चौधरी, रत्नेश सिंग, सचिन कोंडावार, राजेश मोरपाका, श्याम आगदारी, सुरेंद्र जोगी, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, संजय भोंगळे, पारस पिंपळकर, मल्लेश बल्ला, श्रीकांत सावे, विक्की सारसर, रत्नदीप कोंडावार, अनंता बहादे, तुलसीदास ढवस, मधुकर धांडे, गणेश खुटेमाटे, राजू चटकी, संकेत बोढे, स्वप्नील इंगोले, राकेश झाडे, धम्मदीप पाटील, राजाराम कुम्मरवार, राजू डाकुर, अरुण दामेर, पिंटू कल्लापेल्ली, नागेश नलभोगा, महेश नागपुरे, अजित नागपुरे, राजू बोड्ड, प्रणय लिंगम्पेल्ली, कोमल ठाकरे, जनाबाई निमकर, सखुबाई बोबडे, बेबीताई नागतुरे, सुमन वराटे, सुनीता पाटील, सिंधू नागतुरे, सुनंदा लिहितकर, निशा उरकुडे, लता आवारी, शीतल कामतवार, स्वाती गंगाधारे, भारती पर्ते, खुशबू मेश्राम नेहा कुम्मरवार यांचेसह आदी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here