नकोडा ग्रामपंचायत येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार

0
419

नकोडा ग्रामपंचायत येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार

 

आज दिनांक 6 जुलै 2022 रोजी ग्रामपंचायत नकोडा येथे श्रीमती मायाताई कूळसंगे (मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी), श्री श्रीनिवास उन्नवा (मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा तेलगू ) व श्री सारया बुरा (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद तेलगू हायस्कूल) यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यानिमित्त सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या ग्रामपंचायत नकोडा च्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर चे ब्रिजभूषण पाझारे, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या तनुश्री बांदूरकर, सदस्य गण रजत तुरनकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक महादेव वाघमारे, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद मेंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक घोडाम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here