शासकीय गोदामात धान्य उपलब्ध होत नसल्याने धान्य वाटपात होत आहे विलंब

0
703

शासकीय गोदामात धान्य उपलब्ध होत नसल्याने धान्य वाटपात होत आहे विलंब

महिना लोटूनही धान्य मिळत नसल्याने कार्डधारकांत संभ्रम

 

 

विरुर स्टेशन/प्रतिनिधी
रोजंदारी काम करण्याऱ्या गरीब कुटुंबाना व सामन्य जनतेवर उपसमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने रेशनचे धान्य वितरण करीत आहे तसेच कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो मोफत धान्य वितरण प्रणाली अंतर्गत सुरू केल्याने गरिबांना याचा मोठा आधार झाल्याचे दिसून येत आहे ,मात्र प्रशासनाच्या नियोजन अभावी मुळे गरिबांना ठरवून दिलेल्या महिन्यात धान्य मिळत नसल्याने गरीब लाभार्थी सरकारी धान्याच्या दुकानात चकरा मारताना दिसून येत असून कार्डधारक सरकारी धान्य दुकांदारावर बोंबाबोंब करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेतील व अंत्यदोयन योजनेतील लाभार्त्याना दर महिन्यात क्रमशः 2 कीलो तांदूळ व 3 किलो गहू प्रति वैक्ती तर अंत्यदोय योजनेत 20की तांदूळ व 15 की गहू व एक किलो साखर प्रति महीना दिला जातो व तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत पाच किलो मोफत रेशन गरीब जनतेला दिला जात आहे त्यामुळे या वर्गाला मोठा दिलासा मिळाला.

 

राजुरा तालुक्यात एकूण 108 स्वस्त धान्य दुकाना च्या माध्यमातून धान्य वितरण केल्या जाते ,धान्याची अफरातफर रोखण्यासाठी शासनाने दुकानपोच साठी तीन मालवाहतूक गाड्याची सुविधा केली आहे एकीकडे निर्धारीत महिन्यात दोन दोन योजनेचे धान्य या मालवाहनाने पुरवठा करणे अवघड चालले आहे तर दुसरीकडे शासकीय गोदामात धान्य साठा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने सरकारी स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहचत नाही त्यामुळे कार्डधारक दुकानदाराला या अडचणी विषयी विचारून खाली हात घरी परत जात असताना दिसत आहे.

 

आता मे महिना लोटत असला तरी एप्रिल महिन्यातील रेगुलर धान्य व गरीब कल्याण योजनेतील धान्य अजूनही आला नाही त्यामुळे सदर कार्यप्रणाली वर कार्डधारकांत शंका कुशंका निर्माण झाली आहे.

 

त्यामूळे या गंभीर बाबीकडे शासनाने गांभीर्याने घेऊन कार्डधारकात होत असलेली धांदल दूर करावी व महिन्यातील निर्धारित वेळेवर धान्य पोहचावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here