महिलांना संधी उपलब्ध करून देणे काळाची गरज :- अल्काआत्राम

0
525

महिलांना संधी उपलब्ध करून देणे काळाची गरज :- अल्काआत्राम

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने भाजपा महिला आघाडी चंद्रपूरच्या वतीने पोंभुर्णा तालुक्यातील  केमारा ,देवई ,भटरी येथील महिलांची दौड मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 60 पेक्षा जास्त महिलांनी भाग घेतला. त्यामध्ये 20 वर्षाच्या तरुणी पासून 75 वर्षाच्या आज्जी पर्यंत महिला धावल्या. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हाच मुख्य हेतू ठेऊन महिलांना संधी प्राप्त करून देणे त्यांचा आत्मसन्मान जागविणे यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 3000 रोख आणि शिल्ड, दुसरे बक्षीस 1500 रोख आणि शिल्ड, तिसरे बक्षीस 750 आणि शिल्ड तसेच 70 च्या वरील साठी प्रोत्साहन बक्षीस ठेवण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून हिरवी झेंडी दाखून स्पर्धा सुरु करण्यात आली यावेळी उपस्थिती अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर, सुलभा पीपरे नागराध्यक्ष पोंभुर्णा, रोहिणी ढोले सभापती, वैशाली वासलवार, हर्षा कमीडवार, मीरा पोरते, सरपंच सचिन पोतराजे, प्रेमदास इष्टाम सदस्य, मंजुषा आलाम आणि सर्व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण सप्ताह महिला दिन म्हणून जिल्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती   महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्ष  अल्का आत्राम यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here