श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात निरोप समारंभ संपन्न

0
556

श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात निरोप समारंभ संपन्न

नैतिक मूल्यांची जोपासना करणे काळाची गरज -डॉक्टर अनिल मुसळे

 

नांदाफाटा – मौजे नांदा येथील श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप दिला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आणि मुसळे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षण म्हणजे गलगंड पगाराची नोकरी लागणे एक एकमेव उद्देश नसून माणूस म्हणून समाजामध्ये जगताना नैतिक मूल्य प्रत्येकांनी आपल्या अंगी बाळगली पाहिजे. याशिवाय विद्यालयातून तयार होणारा विद्यार्थी हा त्याच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात मध्ये उभा राहिला पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचे रत्नाकर चटप उपस्थित होते. त्यांनी भविष्यात विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी येईल आणि ती कशी सोडवायची याविषयी सखोल मार्गदर्शन केले. व्यासपीठावर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संदीप खिरडकर, शकील शेख, अरविंद कुसलकर, रुपेश विरुटकर आदी उपस्थित होते. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांना अनेक भेटवस्तू प्रदान केल्या. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत विद्यालयांमध्ये चांगले-वाईट आलेले अनुभव कथन केले. अनेकांच्या डोळ्यातून याप्रसंगी अश्रू सुद्धा ढासळत होते. वर्षभर घेतलेल्या स्पर्धांचे सुद्धा या प्रसंगी बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नववीचे वर्गशिक्षक अजय बारसागडे शकील शेख व सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here