कोविड-१९च्या कालावधी मध्ये झालेल्या बी.एड परीक्षेचा निकाल लावण्यात यावा!

0
585

कोविड-१९च्या कालावधी मध्ये झालेल्या बी.एड परीक्षेचा निकाल लावण्यात यावा!

नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची अद्याप परीक्षा झाली नाही त्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी : विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली मागणी

मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व कुलगुरू यांना उपविभागीय अधिकारी मार्फत दिले निवेदन

हिंगणघाट/अनंता वायसे (०३ मार्च २०२१)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील बी.एडच्या विद्यार्थ्यांची कोविड-१९ च्या कालावधीत झालेल्या परीक्षांचा पहिल्या सेमचा निकाल लावण्यात यावा तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या बी.एडच्या विद्यार्थ्यांची अध्याप परीक्षा झाली नाही ती परीक्षा करुणा महामारी मुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी या विद्यार्थ्यांच्या गंभीर मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या पत्राद्वारे विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री उदय सामंत,पदवीधर आमदार अभिजित वंजारी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे कुलगुरू यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मधील बी.एडच्या माजी विद्यार्थ्यांचे तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पहिल्या सेमची परीक्षा कोविड-१९ मुळे रद्द करण्यात आली.
कोरोना संक्रमणाच्या आधी एक पेपर झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकडाउन लागले. त्यावेळेस परीक्षा रद्द करण्यात आली त्यानंतर सप्टेंबर २०२० या कोरोनाच्या कालावधीमध्ये बी.एडच्या माजी विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती परंतु विद्यापीठाने त्या परीक्षेचा निकाल न लावता ती परीक्षा रद्द करून २२ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा २२ फेब्रुवारीला एक पेपर झाला आणि २४ फेब्रुवारीला सर्व विद्यार्थी लांब अंतरावरून परीक्षा देण्याकरिता परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यावेळी विद्यापीठाने कोणतीही पूर्वसूचना न देता अवघ्या अर्धा ते एक तास आधी परीक्षा रद्द झाल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे लांब अंतरावरून आलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका व मानसिक त्रास सहन करावा लागला.
या कोविड-१९ च्या कालावधीमध्ये बी.एडच्या माजी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न करता हजारो विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता जी परीक्षा सप्टेंबर २०२० मध्ये घेण्यात आली होती ती परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा न घेता त्या परीक्षेचा निकाल लावण्यात यावा तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची अद्याप परीक्षा झाली नाही त्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, तरी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार अभिजित वंजारी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांना सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी गौरव तिमांडे, प्रवीण नगराळे, प्रतीक पाटील, हर्षल बागडे, मंगेश हिवंज, प्रफुल पुण्यमंतवार, धनंजय साळवे, आशियाना शेख,योगेश झापे, राहूल गिरडे,स्वप्निल ढोके, अरविंद नगराळे,ऋतुराज कापसे इत्यादी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here