रीतिक धंदरे यांच्या गाण्याच गडचांदुरात सर्वत्र कौतुक

0
578

रीतिक धंदरे यांच्या गाण्याच गडचांदुरात सर्वत्र कौतुक

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
मातोश्री दुर्गात्सव मंडळ गडचांदुर प्रभाग 3 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर रितिक भारत धंदरे यांनी गाणे लिहले. शिवजंयती निमित्त आयोजित कार्यक्रमात रितिकचे गाणे सादर करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर व सचिन भोयर यांनी छत्रपती शिवरायांचा प्रतिमेची पुजा करुन महाप्रसादानाचे वितरण केले. तसेच रितिक नी लिहलेल्या गाण्याचे मान्यवराकडुन कौतुक करण्यात आले. रितीकला पुढील वाढचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातोश्री दुर्गात्सव मंडळाचे लक्ष्मण केळझरकर, आशिष बुजाळे, निखील सातपुते, राहुल बावणे, अनिल सातपुते, आशिष सातपुते, राकेश सुरकर, सागर सातपुते, अविनाश सातपुते यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here