गंगासृष्टी येथे शिव जयंती निमित्त विविध कार्यक्रम

0
523

गंगासृष्टी येथे शिव जयंती निमित्त विविध कार्यक्रम

 

अहमदनगर
संगमनेर 21/2/2022
प्रतिनिधी / संगमनेर तालुक्यातील गुंजाळ वाडी परिसरातील गंगा सृष्टी येथे शिव जयंती सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला . गंगा सृष्टी सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यात सकाळी मान्यवर यांच्या उपस्थितीत शिव प्रतिमेचे पूजन सहपत्निक करण्यात आले . या वेळी शिव आरती ही करण्यात आली. दुपारी परिसरातील शिवबालक यांनी किल्याची प्रतिकृती उभारण्याची स्पर्धा घेण्यात आली, तर महिला करिता शिव रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गंगा सृष्टी परिसरात भगव्या पताका व ध्वज उभारणी करून वातावरण निर्मिती करण्यात आली होती.

सायंकाळी पारंपरिक वेशभूषेत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती, गत वर्षी ही हा सोहळा मोठा उत्साहात पार पडला होता. विविध कलागुण सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी सादर करण्यात आला. वाचेल तो वाचलं ही संकलपना लक्षात घेऊन सर्वच शिवकुमार व शिवकन्या यांना महापुरुषांची चरित्रे पुस्तके वाटप या वेळी सांस्कृतिक मंडळातर्फे करण्यात आले.

परिसरातील सर्वच नागरिक या वेळी उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रातील परप्रांतीय यांचा शिव जयंती मधील सहभाग मोठा होता . या वेळी शिवप्रसाद भोजन कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ रहिवाशी डॉक्टर कोल्हे यांचा वाढदिवस ही या वेळी ,भारतीय संविधान हे पुस्तक भेट देऊन साजरा करण्यात आला. महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकारणी ने मोठे श्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here