प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन लेखी आश्वासनानंतर तुर्तास मागे…

0
431

प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन लेखी आश्वासनानंतर तुर्तास मागे…

 

राजुरा : सुब्बई येथील जवळपास 300 प्रकल्पग्रस्त शेतकरी वेकोली च्या विरोधात नौकरी आणि आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे. या मागणीसाठी धरणे आंदोलनाला बसले होते. बल्लारपूर हद्दीतील सुब्बई-चिंचोली प्रकल्प जवळपास 12 वर्षापासून प्रलंबित आहे. यामध्ये जमिनीचे भूसंपादन झालेल्या 205 शेतकऱ्यांची नौकरी मिळाली नसून सुमारे 40 करोड रुपये मोबदला मिळाला नाही. प्रकल्पग्रस्त नौकरी च्या मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वेकोली नौकरी देणार असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे वेकोली कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळी 11 वाजता पासून हे आंदोलन 5 वाजेपर्यंत सुरू होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिस अधिकारी आणि महसूल अधिकारी यांनी वेकोली च्या अधिकारी सोबत तातडीची बैठक घेतली. ही बैठक जवळपास चार तास चालली. शेवटी चार तासा नंतर वेकोली व प्रकल्पग्रस्त यांच्यात तोडगा काढून येत्या चार दिवसात सीएमडी नागपूर याच्यासोबत बैठक लावून डीनोटिफिकेशन रद्द करून प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून नौकरी व आर्थिक मोबदला मिळवून देण्याबाबत प्रकल्पग्रस्तांच्या मागणी संदर्भात कार्यवाही करण्यात येईल. या लिखित स्वरूपात वेकोली ने दिलेल्या आश्वासनाने सदर धरणे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.

बैठकीत वेकोली चे अधिकारी श्री. पुल्लय्या, श्री. सिंग, श्री. माटे तसेच पोलिस प्रशासनाने श्री. राठोड व प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

परंतु चार दिवसात जर सिएमडी नागपूर याच्यासोबत बैठक झाली नाही तर शेतकरी तीव्र भूमिका घेणार असल्याचे अविनाश जाधव, बबन उरुकुडे, प्रविन मेकर्तीवार यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here