रामपुरवासियांचे वेकोली मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0
442

रामपुरवासियांचे वेकोली मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सरपंच वंदना गौरकार यांचे नेतृत्व ; पुनर्वसित वस्तीत विकास कामे करा

राजुरा : वेकोलीने पुनर्वसित केलेल्या रामपूर वस्तीत मागील अनेक वर्षांपासून वेकोलीने दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांना विविध समस्येला समोर जावे लागत असून याच मागण्या घेऊन आज रामपूर वासीयांनि सरपंच वंदना गौरकार यांच्या नेतृत्वात वेकोली मुख्य महाप्रबंधक कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

वेकोलीने सास्ती कोळसा खाणीकरिता भडांगपूर गाव १९९० साली उठवून रामपूर नावाने पुनर्वसन केले मात्र पुनर्वसन करताना मूलभूत सोयी सुविधा पुरविणे आवश्यक असताना वेकोलीने विकास कामे फक्त कागदोपत्री दाखविले असल्याने पुनर्वसित रामपूर वासीयांना मूलभूत सोइ सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. शुद्ध पिण्याचे पाणी नाही, रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, प्रकल्पग्रस्तांना जमीनीचे पट्टे, मुलांना शिक्षणासाठी शाळा, जेष्ठांना बसण्यासाठी बगिचा यासह अन्य गोष्टी वेकोलीने पुरविणे आवश्यक होते मात्र प्रकल्पग्रस्त नागरिकांना यासर्व गोष्टीना मुकावे लागत आहे.

म्हणून झोपडपट्टी व रामपूर वासीयनीं वेकोलीच्या मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर हक्काचे पट्टे मिळणे, गावातील रस्ते नाल्या बनवून मुख्य चौकाचे सौदर्यीकरण करणे, रामपूर झोपडपट्टी वासीयांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी पुनर्वसित वस्ती व खाली जागा ग्रामपंचायतला हस्तांतरित करने, ग्रामपंचायत चा कर भरणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिवर्षं 1 कोटी CSR फंड देणे, वेकोली द्वारा उत्पादित कोळशावर प्रति टन 400 रुपये शासनाला दिला जाणाऱ्या स्वच्छता कराच्या 10% प्रतिशत रक्कमेचा प्रकल्पग्रस्त गावांना देणे, धोपटाला ते रामपूर टी पाइन्ट आणि टी पाइन्ट ते माता मंदिर पर्यंत सिमेंट कॉक्रेट रोड दुभाजकासह बनवून पाथदिवे लावणे आदी मागण्या आंदोलनात करण्यात आले. यावेळी वेकोलीचे नियोजन अधिकारी यांनी आंदोलांकर्त्याची भेट घेतली मात्र आंदोलनकर्ते मुख्य महाप्रबंधक यांच्याशी चर्चा केल्याशीवाय आंदोलन थांबणार नसल्याचे सांगितले.

यावेळी आंदोलनात रामपूरची सरपंच वंदनाताई गौरकार, उपसरपंच सुनिताताई उरकुडे, सदस्य हेमलताताई ताकसांडे, सिंधुताई लोहे, शीतल मालेकर, संगीताताई विधाते, लताताई डकरे, रमेश झाडे, विलास कोदिरपाल, जगदीश बुटले, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गौरकार, गुलाब दुबे, रामा घटे, रमेश गौरकार, मारोती जानवे, राहुल बानकर, शंकर निमकर, केशवराव घुघुल, मधुकर उरकुडे, सिंधुताई लांडे, स्वरूपाताई दुबे, किरण लांडे, गीता जीवतोडे, अंजनाबाई गौरकार, संगीता पिंपळकर, गजानन देरकर, नथु पायपरे, सुरेश हनुमंते, भाऊराव केळझरकर, आकाश अगडे, गजानन पोनलवार, गणेश हिंगाने, सुधाकर जंपलवार, अंबादास लडके, भाऊराव उरकुडे, गंगाधर बोबडे, विशाल ठाकरे, दिलीप बोबडे, रेखा आत्राम, बीड साळवे, रंजना टेकाम, माया आत्राम, मुक्ता अंबोरे, उर्मिला कडुकर, रंजना टेकाम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here