औद्यागिक नगरी नांदा येथे शिवस्मारक समितीची स्थापना

0
626

औद्यागिक नगरी नांदा येथे शिवस्मारक समितीची स्थापना

राजे छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारून सौंदर्यीकरण करणार

 

नितेश शेंडे, प्रतिनिधी
नांदाफाटा: अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, दालमिया सिमेंट कंपनी, पैनगंगा वेकोली खदान या उद्योगांमुळे नांदा, बिबी, आवारपुर, हिरापुर, नोकारी, सांगोडा हि गावे विकसित होत असुन न‍ांदा गावच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहेत. जिल्ह्यात नांदाफाटा औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. मागील पाच वर्षांत महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कडून मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने नांदा गावचा विकास होत आहे. मा. सुभाषभाऊ धोटे आमदार, राजुरा यांच्या विशिष्ट प्रयत्नाने नांदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले. जवळपास १२ कोटी रुपये निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याकरिता नांदा उपरवाही क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन समस्या जाणून घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता लागणारे कर्मचारी व सोयी-सुविधांकरिता फर्निचर इत्यादीकरिता शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. नांदा गावच्या लोकसंख्येनुसार नांदा ग्रामपंचायतीचे रूपांतरण आता नगरपंचायतीमध्ये करावे अशी जनभावना आहेत. नांदा येथील युवकांना खेळाचा सराव करणे, व्यायाम करणे याकरिता खेळाचे मैदान नाहीत. परिसरातील नागरिक सकाळी प्राणायाम करणे, योगासन करणे, पैदल फिरणे याकरिता अल्ट्राटेक कंपनीमध्ये जात होते. परंतु मागील दोन वर्षापासून कंपनीमध्ये नागरिकांना मॉर्निंग वॉककरिता जाण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. येथील नागरिकांना विकसीत मैदान उपलब्ध होणे अत्यावश्यक झाले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकाचे व्यतिरिक्त नांदाफाटा येथील इतर कुठल्याही चौकाचे सौंदर्यीकरण नांदा ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेले नाहीत. परिसरातील चौकाचे सौंदर्यीकरण करणे, नागरिकांना व युवकांना खेळाचे मैदान व उद्यान बनविण्याकरीत‍ा येथील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती आहेत.

त्या अनुषंगाने आज २६ जानेवारी २०२२ प्रजासत्ताक दिनाच्या दिवसाचे औचित्य साधत येथील विविध क्षेत्रातील सामाजिक व लोक चळवळीत सहभागी असलेल्या युवक व नागरिकांकडून औद्योगिक नगरी नांदा येथे शिवस्मारक समिती स्थापन करण्याची संकल्पना करण्यात आली आहेत.
शासन, लोकप्रतिनिधी, लोकसहभाग यामध्ये समन्वय घडविण्याचे कार्य शिवस्मारक समिती करणार आहेत. नांदा, बिबी, आवारपुर, हिरापुर, नोकारी, सांगोडा यासह पंचक्रोशीतील गावातील लोकसहभागातून नांदा ग्रामपंचायतीचे प्रवेशद्वारासमोर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा बसविणे परिसरातील चौकाचे सौंदर्यीकरण करणे तसेच नांदा येथे तीन एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बनविणे ही संकल्पना ठेवण्यात आली आहेत.प्रा. आशिष देरकर, मा. शिवचंद्रजी काळे, पुरूषोत्तम निब्रड यांच्या मार्गदर्शनात खालील प्रमाणे शिवस्मारक समितीचे सदस्याची समिती स्थापन करण्यात आली आहेत. शिवस्मारक समितीची कार्यकरणी गठीत करणे, सदस्यता वाढविणे, समीतीचे पंजीकरण करणे, पुढील रूपरेषा ठरविली जातील अशी माहिती समिती संयोजक अभय मुनोत यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here