गडचांदूर येथे शेतकरी युवा आघाडीचे 2 दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

0
416

गडचांदूर येथे शेतकरी युवा आघाडीचे 2 दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

ॲड. वामनराव चटप, ललित बहाळे व गुणवंत हंगरगेकरांचे मार्गदर्शन

 

कोरपणा/प्रतिनिधी : गडचांदूर येथे चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटना व स्वातंत्र भारत पक्षाच्या सहयोगाने शेतकरी युवा आघाडीच्या वतीने 5 व 6 जानेवारी रोजी येथील बालाजी सेलिब्रेशन हॉल येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या दोन दिवसीय शिबिराला शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.यात पहिल्या दिवशी शेतकरी संघटनेचे विचार,कार्यपद्धती,युगात्मा शरद जोशी यांचे योगदान,बाजारपेठ,तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य व स्वतंत्र भारत पक्ष,शेतकरी विरोधी कायदे,संघटनेची बांधणी,युवकांपुढील आव्हाने, वेगळा विदर्भ का ? यासह विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले.अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप होते तर स्वभापचे प्रांताध्यक्ष मधुकर हरणे, माजी प्रांताध्यक्ष दिनेश शर्मा,गुणवंत पाटील हंगरगेकर,सुधीर बिंदू,सतीश दाणी,जिल्हाध्यक्ष अरूण पाटील नवले इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

ॲड.दिपक चटप यांनी शेतकरी युवकांच्या समस्या व संघटनात्मक बांधणीचे पैलू विषयी विचार मांडून अनुभव कथन केले.यानिमित्ताने युवकांच्या समस्या व प्रश्नांविषयी सविस्तर उहापोह झाला.या शिबिरात 250 च्या जवळपास युवकांनी सहभाग नोंदविला.शेतकरी महिला आघाडीच्या पौर्णिमा निरंजने,प्रा.ज्योत्स्ना मोहितकर,संघटनेचे डॉ.संजय लोहे,अविनाश मुसळे,नीळकंठराव कोरांगे,दिनकर डोहे,प्रा. निळकंठ गौरकर,पंढरीनाथ बोंडे,मदन सातपुते,बंडू पाटील राजूरकर,प्रविण सावकार गुंडावार,विलास धांडे,संध्या सोयाम, नगरसेविका रजिया बेगम शेख खाजा,शेतकरी युवा आघाडीचे ॲड.दीपक चटप, संतोष पटकोटवार, सैय्यद मूम्ताज़ अली, श्रीकांत घोरपडे,नरेश सातपुते, सुनील मडावी यांच्यासह शेतकरी संघटनेच्या युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here