समुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे मानधन मिळणार 

0
360
समुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे मानधन मिळणार 
 
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश 
 
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये समुदाय संसाधन व्यक्तींची महत्त्वपूर्ण भूमिका असून समुदायस्तरीय संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सेवा यापुढेही समुदायास उपलब्ध होत असतात. ग्रामसंघ व प्रभागसंघांना शासनाकडून अभियानामार्फत निधी उपलब्ध होत नसल्यामुळे समुदाय संसाधन व्यक्तींचे मानधन सतरा महिन्यापासून प्रलंबित असलेले मानधन प्रलंबित होते. त्याकरिता वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः भेटून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मानधन देण्याविषयी मागणी केली होती. त्याची दखल घेत उमेद कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येण्याच्या निर्णय घेणयात आलेला आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समुदायस्तरीय संस्था जसे की ग्रामसंघ व प्रभागसंघ यांच्यामार्फत समूह संसाधन व्यक्तींची (सीआरपी) नेमणूक मानधन तत्वावर संस्थामार्फत करण्यात आलेली आहे. गरिबांना गरिबीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना पोषक वातावरणाची आवश्यकता असते हे सूत्र लक्षात घेऊन अभियान सुरु झाल्यापासून मागील आठ वर्षात तयार करण्यात आलेले स्वयंसहाय्यता गटांना प्रशिक्षण देऊन व आर्थिक सहाय्य करुन त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी अभियानांतर्गत सातत्याने काम करण्यात येत आहे. अभियानांतर्गत तयार झालेले स्वयंसहाय्यता गटातील महिला अभियानाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत असून त्यांच्याकडे उपजीविकेचे स्त्रोत निर्माण करण्यात येत आहेत परंतु गाव स्तरावर कार्यरत समूह संसाधन कर्मचाऱ्याचे मानधन मागील सतरा महिन्यापासून मिळाले नसल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः भेटून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मानधन देण्याविषयी मागणी केली होती. त्याची दखल घेत उमेद कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उमेदीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. सर्वानी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here