सर्वसामान्यांवर कोरोनानंतर ‘महागाई’चे सुल्तानी संकट कोसळलंय! बसपा प्रदेशाध्यक्ष अँड. संदीप ताजने यांची केंद्र व राज्य सरकारवर टीका

0
510

सर्वसामान्यांवर कोरोनानंतर ‘महागाई’चे सुल्तानी संकट कोसळलंय!

बसपा प्रदेशाध्यक्ष अँड. संदीप ताजने यांची केंद्र व राज्य सरकारवर टीका

 

मुंबई, १३ ऑक्टोबर

देशात पेट्रोल,डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. स्वयंपाक घरातील गॅस, पीएनजी, सीएजनी महागले आहेत.सर्वसामान्यांवर कोरोनानंतर ‘महागाई’चे सुल्तानी महासंकट कोळसले आहे. अश्या स्थितीत जनतेला महागाईच्या दरीत ढकलून केंद्र आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार राजकारणात गुंतले आहे, असा आरोप बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी केला.

सर्वसामान्यांशी निगडीत महत्वांच्या मुद्दयांवरून लक्ष विचलित करण्याचे काम केंद्र आणि महावि सरकार करीत आहे. या सरकारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संवाद यात्रेनिमित्त धुळे येथे आयोजित कार्यक्रमातून त्यांनी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

धुळे जिल्हा अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. जिल्ह्याला उपेक्षित ठेवण्याचे काम आजवर सत्ताधार्यांनी केले आहे. पंरतु, धुळ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेच्या चाव्या स्थानिकांनी बसपाच्या हाती दिल्या तर विकास खेचून आणू, अशी ग्वाही अँड.ताजने यांनी यावेळी दिली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीपासून रचना कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी कार्यक्रमातून दिले.

मा.बहजन मायावती जी यांच्या नेतृत्वाखाली ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’च्या उद्दिष्य प्राप्तीसाठी सर्वांनी एकत्रित येवून मेहनतीने शासनकर्ते होण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत राहीले पाहिजे, असे आवाहन अँड.ताजने यांनी केले. कार्यक्रमात प्रदेश महासचिव इंजि.शांताराम तायडे, जेष्ठ नेते रमेश निकम,जिल्हा प्रभारी रमेश अहिरे, मिलिंद बैसने, जिल्हा अध्यक्ष आनंद सैंदाने, शहर अध्यक्ष अॅड.संदीप जावरे, उपाध्यक्ष प्रदीप क्षीरसाठ,महासचिव रमेश वानखेडे, सचिव विजय भामरे, संघटक गोविंद कांबळे,बीव्हीएफ विजय मोरे,संगम बागुल यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष उपस्थित होते.

उत्तर प्रदेशात निळ्या त्सुनामीची चाहूल- प्रमोद रैना

उत्तर प्रदेशाच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा निळ्या त्सुनामीची चाहूल जाणवू लागली आहे. गुंडाराज, हुकूमशाही आणि शोषणातून मुक्ततेसाठी यंदा राज्यातील जनता बसपा ला मतदान करून पाचव्यांदा मा.बहन मायावती यांना मुख्यमंत्री बनवतील असा दावा प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केला. महाराष्ट्रातही सर्वसमावेश समृद्धी साठी बसपाचे सरकारच पर्याय आहे. राज्यातील दलित,आदिवासी, ओबीसी, मुस्लिम तसेच इतर धर्मियांनी एकत्रित येवून सर्वजन हितकारकी अश्या बसपच्या सरकारला सत्तेवर आणावे, असे आवाहन रैना यांनी कार्यक्रमातून केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here