बीफार्मसी च्या १२ विद्यार्थ्यांच्या निकालात गोंधळ

0
512

बीफार्मसी च्या १२ विद्यार्थ्यांच्या निकालात गोंधळ

फार्मसी कृती समिती चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष सागर मंडल, जिल्हा सचिव सुरज गव्हाने यांचा हस्तक्षेप

२ दिवसात निकाल लावु असे विद्यापीठाचे आश्वासन

 

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चंद्रपुर येथील high-tech college of pharmacy च्या १२ विद्यार्थ्यांच्या निकालात गोंधळ करण्यात आला. सरळ द्वितीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्या १२ विद्यार्थ्यांच्या अंतिम (तृतीय) वर्षाच्या निकालात विद्यापीठाच्या व काॅलेज च्या भोंगळ कारभारा मुळे १२ विद्यार्थ्यांच्या निकालात गोंधळ झाला आहे. त्यामुळे १२ विद्यार्थ्यांना समोरिल शिक्षणासाठी अडथळा निर्माण होत होता याची दखल घेत फार्मसी कृती समिती चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष सागर मंडल, जिल्हा सचिव सुरज गव्हाने यांनी गोंडवाना विद्यापीठा मध्ये जाऊन तेथील संबधित अधिकार्‍यांसोबत बोलुन त्यांनी हस्तक्षेपामुळे विद्यापीठाने २ दिवसात संबधित विभागाचे तांत्रिक अडचणी दुर करून निकाल लावण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here