गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील चिखलयुक्त रस्त्यामुळे नागरिकांचे हाल

0
451

गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील चिखलयुक्त रस्त्यामुळे नागरिकांचे हाल

लवकरात लवकर काम पूर्ण करा – युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी यांची मागणी

 

 

चामोर्शी (गडचिरोली), सुखसागर झाडे

चामोर्शी शहरातील महामार्गाच्या मुख्य रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यापासून हाती घेतलेले काम अतिशय मंद गतीने सुरू असून आता अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे महामार्गाकरीता खोदकाम केलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे तिथून नागरिकांना आवागमन करताना तारांबळ उडत आहे. त्यामुळे ठेकेदारानी कामाला गती देऊन काम त्वरित पूर्ण करावे. अशी मागणी युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी च्या वतीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांचेकडे निवेदनातून केली आहे.

 

गेल्या अनेक महिन्यापासून रस्ता खोदून ठेवला आहे त्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. चामोर्शी हे शहर तालुक्याचे ठिकाण असून येथे आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येत असतात.

 

 

चामोर्शी येथील मुख्य ठिकाणी परिवहन महामंडळाचा प्रवासी निवारा असल्याने येथे शाळा सुटल्यानंतर घरी जाण्या करिता विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते आहे. दोन्ही बाजूंनी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते रस्त्याची एक बाजू खोलीकरण करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी पाणी साचून असल्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. करिता कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये व सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. असे युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शीच्या वतीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

 

 

यावेळी उपस्थित युवा संकल्प ग्रुप शाखा-चामोशीँ चे प्रमुख सुरज नैताम उपप्रमुख प्रशांत चुदरी सदस्य अजय भाडेंकर, सुरज चौके, विजय भाडेकर, प्रशिक नदेश्चवर, ध्रुप चिचघरे, डॉ विशाल सहारे, अजय बुराडे, सुरज सोयाम, कातिँक चौके, दिलीप शेटृटे, भुषण बारसागडे, ज्ञानेश्वर लटारे, शंतनु पिपरे, राहूल चिचघरे, सचिन कुनघाडकर, अनुराग बन्सोळ, सपनिल चिचघरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here