कन्हाळगाव येथील बचत गटाची फसवणूक, दोषींवर कारवाईची मागणी

0
559

कन्हाळगाव येथील बचत गटाची फसवणूक, दोषींवर कारवाईची मागणी

कोरपना, प्रवीण मेश्राम

कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील महिला बचत गट विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा कोरपना या बँकेत संलग्न असून या बँकेमार्फत दरवर्षी गटांना कर्ज मिळत होते. मागील वर्षी दोन लाख रुपयांचे कर्ज मिळाले. सर्व गटातील सदस्यांनी सचिवांकडे दोन लाख रुपये जमा करून कर्ज भरण्याकरिता सचिव यांच्याकडे दिले. मात्र सदर सखी महिला बचत गटांच्या सचिव यांनी सखी महिला बचत गट कन्हाळगाव या गटाचे कर्जाचे पैसे भरलेच नाहीत.

मात्र गटातील महिलांना कर्जाचे पैसे भरल्याचे बताना करत नवीन कर्ज करिता कर्जाची फाईल बनवण्यात आली. नव्याने कर्ज मंजूर झाले आहे असे सर्व सदस्यांना सांगितले गेले. तेव्हा सर्व सदस्य सचिव यांच्या घरी गेले असता कर्ज वाटप करण्यास आठ ते दहा दिवसाचा कालावधी लावल्यामुळेच सर्व महिलांना संशय आला. यामुळे सदर महिलांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा कोरपना या ठिकाणी धाव घेऊन मॅनेजर यांच्यासोबत सदर गटाच्या कर्जा बद्दल चर्चा केली असता मॅनेजर यांनी गटातील महिलांना मागील वर्षीचे कर्ज न भरल्यामुळे आपल्या बचत गटाला नव्याने कर्ज मंजूर झाले नाही. असे सांगितल्यानंतर सर्व सदस्यांनी सचिव यांच्याकडे जाऊन विचारणा केली असता सदर सचिवाने दोन लाख रुपये कर्ज भरलेच नसल्याचे उजेडात आले. त्यामुळे नव्याने कर्ज मंजूर न झाल्यामुळे सदर गटातील महिला आता कर्जापासून वंचित राहिल्या. कर्जाचा डोंगर वाढतच असल्याने या गटातील महिलांना तर व्याजाचा भुर्दंड बसत असल्याने सदर फसवणूक करणार्‍या व्यक्तींकडून व्याजासहित पैसे वसूल करण्यात यावे व सदर व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी. आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सखी महिला बचत गटातील महिलांनी केली आहे. याची तक्रार कोरपना तहसीलदार, पोलीस स्टेशन कोरपना, प्रकल्प समन्वय उमेद पंचायत समिती कोरपना यांना माहिती सादर केली.

विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथील सखी कर्जाची फाईल बनवून देण्याकरिता तेराशे रुपये घेतल्या जात आहेत. बचत गटातील महिलांची एक प्रकारे लुबाडणूक केली जात आहे. तेव्हा सदर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यावर अंकुश लावावा. दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिता संजय केराम, अध्यक्ष शिल्पा गजानन वाघाडे, सदस्य संगीता संदीप आघाडी, सदस्य मेगा विजय वाघाडे, सदस्य शारदा विश्वनाथ ऑस्कर, सदस्य रमेश खंडाळकर, सदस्य रंजना राजू बागडे, सदस्य विमलबाई रामदास मडावी, सदस्य मंगला मनोर पारखीं यांनी तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. जर पैसे न मिळाल्यास आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरणार नाही अशी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here