भारतीय जनता पक्ष चे किसान महामोर्चा महामंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा संगमनेर दौरा

0
1072

भारतीय जनता पक्ष चे किसान महामोर्चा महामंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा संगमनेर दौरा

प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गायकर पाटील

 

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राष्ट्रीय महामंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या उपस्थित शेतकरी कृषी संवाद कार्यक्रम भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाअध्यक्ष सतिश राव कानवडे यांच्या औषधी वन शेती मध्ये नुकताच पार पडला. यावेळी अनिल बोंडे यांनी उपस्थितीत शेतकऱ्याना केंद्र सरकारच्या विविध योजना बाबत , वन व औषधी शेती बाबत सखोल मार्गदर्शन केले .सतीश कानवडे यांनि त्यांचा व उपस्थित पदाधिकारी यांचा सत्कार केला. औषधी शेती किफायतशीर व्यवसाय म्हणून करावी, शेतकरी व व्यापारी कंपनी यांचे करार कायदेशीर प्रक्रिया करून करावेत, केंद्र सरकार विविध योजना द्वारे भरीव अर्थ साह्य ही देते त्याचा ही लाभ शेतकरी बंधूंनी घ्यावा ,असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे भाजप संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे , अकोले भाजपा तालुकाअध्यक्ष सीताराम भांगरे , किसान मोर्चा तालुकाअध्यक्ष दिलीप कोल्हे , युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष शैलेश फटांगरे , तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा सागर कानवडे व योगेश डूबे , संघटन सरचिटणीस हरीश वलवे , अकोले तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे , किसानमोर्चा तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब कानवडे व बाळासाहेब सदाशिव गोपाले , निमगाव पागा चे मा.सरपंच बंडू किसन कानवडे , सावरचोळ सोसायटी मा.चेअरमन रामदास कारभारी कानवडे , संदीप गोविंद कानवडे , संपत कारभारी कानवडे , शरद कारभारी कानवडे , गोरख बाबूराव कानवडे , पांडुरंग विश्वनाथ कानवडे , नवनाथ नाथू मेंगाल , बाळासाहेब तुकाराम कानवडे , संजय पावशे, भाऊसाहेब कुंडलिक कोल्हे , आशीष कोठवळ , विजय भूतांबरे , प्रविण कातोरे , भारत पिंगळे , आदी शेतकरी उपस्थितीत होते.अकोले तालुका भाजपा किसान मोर्चा नरेंद्र नवले यांनी सूत्रसंचालन केले , कवी ज्ञानेश पुंडे , यांनी आभार मानले..यावेळी कानवडे वनस्पती उद्यान मध्ये सर्व मान्यवरांची शिवार फेरी केली. कानवडे यांनी दहा एकर क्षेत्रात विविध औषधी वनस्पती याची लागवड केली असून, त्यांचे स्वतःचे प्रतिकार शक्ती वाढवणारे नैसर्गिक काढा बाजारात आला आहे. अनेक शेतकरी बांधवांना ते या शेती कडे वळण्यास प्रवृत्त करत असून , आंतरराष्ट्रीय कंपन्या बरोबर करार करून शेती चे आर्थिक गणित बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाने ही त्यांचा उपक्रमाची दखल घेतली असून, राज्य पातळीवर त्यांनी औषधी वनस्पती शेतीचा प्रचार व प्रसार वेगाने करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here