एरंडोल तालुक्यात ८ हजारा ४१४ विद्यार्थ्यांनी उघडली जिल्हा बँकेत खाते…

0
495

एरंडोल तालुक्यात ८ हजारा ४१४ विद्यार्थ्यांनी उघडली जिल्हा बँकेत खाते…

जिल्हा प्रतिनिधी/प्रमोद चौधरी

एरंडोल:-उन्हाळी सुट्टीतील पोषण आहार ऐवजी बँक खात्यात पैसे जमा करण्या संदर्भात तालुक्यात ११८ शाळांमधील विद्यार्थ्यांची बँक खाते उघडण्याचे काम सुरू आहे
वास्तविक राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सदर खाते उघडणे आवश्यक होते परंतु शुन्य शिल्केवर खाते उघडण्याची राष्ट्रीयकृत बँक प्रशासनाची मानसिकता नाही. तसेच या बँकांमध्ये पालकांना बँकेत बोलवतात. कोरोना च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळने आवश्यक आहे. याउलट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या योजनेसाठी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे .
शिक्षक विद्यार्थ्यांचे व पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स, बोनाफाईड, दोघांचे फोटो जमा करून बँकेचा फॉर्म भरून जमा करण्याचे काम करीत आहेत. एरंडोल तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात जिल्हा बँकेच्या कासोदा, खर्ची ,उत्राण, आडगाव, यांच्यासह दहा ते बारा शाखा आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांची सोय झाली आहे.
एरंडोल तालुक्यात या योजनेचे एकूण १८ हजार ८४८ लाभार्थी असून सर्वांची बँक खाते उघडणे सुरू आहे आतापर्यंत ८ हजार ४१४ इतक्या विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात आली आहे. ५ हजार ३४० फॉर्म बँकेत जमा करण्यात आले आहेत अजून ५ हजार ३९३ विद्यार्थ्यांची खाती उघडणे बाकी आहे त्यासाठी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड व फोटो आवश्यक असून शिक्षकच खाते उघडण्याचे काम करीत आहे.
मे महिन्याच्या शालेय पोषण आहार आणि ऐवजी थेट विद्यार्थी खात्यावर पैसे जमा करण्याचा शासन आदेश आहे. म्हणून शाळांनी बँक खाते उघडणे सुरू केले आहे राष्ट्रीयीकृत बँका बरोबरच पोस्टाचे ऑनलाईन खाते सुद्धा चालणार आहेत. तसेच जेडीसीसी बँक विद्यार्थ्यांची खाती उघडून देत आहेत त्यामुळे जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक व ग्रामीण जनतेची बँक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here