ट्रायबल फोरमचे पहिले अधिवेशन संपन्न

0
561

ट्रायबल फोरमचे पहिले अधिवेशन संपन्न

 

 

तालुका प्रतिनिधी /रत्नदिप तंतरपाळे 

 

 

 अमरावती / चांदूर बाजार (कृष्णापुर):- ट्रायबल फोरमचे पहिले अधिवेशन शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक ४ जुलै २०२१ रोजी आँनलाँईन द्वारे संपन्न झाले आहे.

या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड प्रमोद घोडाम होते. प्रमुख पाहूणे म्हणून नाशिकचे सेवानिवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी एकनाथ भोये, आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या संचालिका मिनाक्षीताई वेट्टी,पुणे येथील आदिवासी जमातींचे अभ्यासक मंजूर तडवी,यवतमाळचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार सिडाम,प्रमुख अतिथी म्हणून मुंबईचे सदानंद गावित,रमेश परचाके, पुणेचे डी.बी.घोडे, नाशिकचे हरीदास लोहकरे, नागपूरचे विवेक माळवी, पांढरकवडाचे रितेश परचाके

आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी ट्रायबल फोरमची संपूर्ण भूमिका मांडून,घोषणा व त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.प्रमुख मान्यवरांनीही आदिवासींचे वनहक्क आणि शासनाची भूमिका, आदिवासी महिलांची दशा आणि दिशा, आदिवासी समाजातील घुसखोरी आणि समाजाची भूमिका, आदिवासी युवकापुढील रोजगार मिळण्याबाबतचे आव्हान आणि मार्ग या विषयावर मार्गदर्शन केले.

या अधिवेशनाला विदर्भ,पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातून प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूरचे डाँ.पंकज कुळसंगे यांनी केले.सुत्रसंचालन मुंबईचे डॉ. दत्तात्रय दिघे व सांगलीचे दिलीप आंबवणे यांनी केले तर आभार यवतमाळचे प्रफुल कोवे यांनी मानले.

अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी रोहित सुपे, गुलाब भोईर,संपत रोंगटे,कासम सुरत्ने, समीर शिंदे, अर्जून युवनाते, शालिक मरसकोल्हे, दिपक करचाल, सिमा मंगाम,सुनिता गेंगजे, क्रुष्णा मिरासे,विलास मेश्राम, शंकर पंधरे,परशुराम टेकाम, अरुण तिळेवाड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here