जनावरे तस्करी करणारे मुद्देमालासह कोठारी पोलिसांच्या जाळ्यात

0
538

जनावरे तस्करी करणारे मुद्देमालासह कोठारी पोलिसांच्या जाळ्यात

राज जुनघरे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील वळसा येथुन जनावरें तस्करी करणाऱ्या वाहनास कोठारी ते कवळजई मार्गांवर कोठारी पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली असून तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोठारी, कवळजई, तोहोगाव मार्गे नेहमी जनावरांची आड मार्गाने वाहतूक होत असते. वळसा गडचिरोली येथुन अशीच जनावरे चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार तुषार चव्हाण यांना मिळताच कोठारी, कवळजई मार्गांवर गस्त लावली. जनावरे वाहतूक करणारे वाहन क़. टीएस २० टी ६७३२ यास थांबवून तपास केला असता त्या आईशर वाहणात गोवंशीय जनावरे ३५ आढळून आले. ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सदर वाहन, जनावरे ताब्यात घेऊन आरोपी मुंडकर मोशीद खलिल वय २१ वर्षे रा. मंगरूळ ता. जळकोट जि. लातुर व असलम नबी शेख वय २० वर्षे रा. गणेशपुर ता. वाकडी जि. आसिफाबाद, तेलंगणा अशी आरोपींची नावे असुन त्यांच्या वर कलम ११ ( १ ) ( ५ ) सह कलम, ५,५ ( अ ), ५ ( ब ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात सदर जनावरे सय्यद खलिल सय्यद अली यांच्या नावे जात असल्याची पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांच्या कारवाईने जनावरे तस्करात खडबळ माजली असुन या कारवाई ने तस्करांना चाप बसला आहे. पुढील तपास कोठारी पोलिस स्टेशन चे पिएसआय धिरज राजूरकर व पो.का. श्रिनिवास जाधव, सचिन पोहनकर, हरिश्चंद्र देऊडकर, साईनाथ उपरे, बालाजी कवलकर आदी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here