तालुक्याच्या विकासासाठी प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे (पत्रकाराचा) लढा

0
353

तालुक्याच्या विकासासाठी प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे (पत्रकाराचा) लढा

 

जिवती:-  जिवती हा चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका.. दुर्गम आणि डोंगराळ भाग.. त्यामुळं विकासापासून कोसो योजने दूर.. तालुका झाल्यावर विकास होईल हे जिवतीकरांचे स्वप्न हवेतच विरले.. जिवतीच्या विकासावर लोकप्रतिनिधी देखील कायम मौन पाळले.. लोकप्रतिनिधी बोलत नाहीत म्हटल्यावर प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे पुढे आले आणि त्यांनी जिवती तालुक्यातील विविध समस्या सुटाव्यात यासाठी आमरण उपोषण सुरू केले.

तालुक्यातील पत्रकारांनी व जय विदर्भ पार्टी व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुदाम राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुकेश चव्हाण,लहुजी ब्रिगेड कुभेझरी चे बळिराम भालेराव, मुलनिवासी समिती अध्यक्ष एल.डी. मंगाम, युवक काँग्रेस जिवती चे कंटू कोटनाके, ग्राम आरोग्य फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रविण येरमे सर, शेतकरी संघटनेचे उपध्यक्ष विनोद पवार, आम आदमी पार्टीचे सुनिल राठोड गोविंद गोरे उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली आणि तोगरे यांना पाठिंबा दिला आहे.

बातमी देणं एवढंच पत्रकारांचं काम असतं असे अनेकांना वाटतं.. मात्र ते खरं नाही.. व्यवस्था निष्क्रीय असेल तर हातात चाबूक घेऊन रस्त्यावर उतरणं हे देखील पत्रकारांचं काम आहे असं आम्ही मानतो. तालुक्यातील पत्रकारांनी ही जबाबदारी अनेक वेळा समर्थपणे पार पाडली आहे.

जिवती तालुक्यातील विविध समस्याचा लढा नक्कीच यशस्वी होईल.. आता जिवती तालुक्यासचा विकासासाठी देखील एक प्रहार रुग्णसेवक तथा (पत्रकारच) पुढे आला आहे.. तालुक्यातील विकासाचा प्रश्न हाती घेऊन एक प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे (पत्रकार) उपोषणास बसतो ही जिल्ह्यातील तथा तालुक्यातील सरपक्षीय पुढारयांना चपराक आहे.. त्यांनी आता तरी तळयाकडे मतांसाठी नव्हे तर विकासासाठी लक्ष द्यावे आम्ही सारे रुग्णसेवक जिवन तोगरे बरोबर आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here