_विद्यापीठ पुन्हा एकदा परीक्षा अर्ज स्वीकारण्यास तयार

0
308

Students Breaking News

NSYF च्या पत्राला मीळाले यश.

_विद्यापीठ पुन्हा एकदा परीक्षा अर्ज स्वीकारण्यास तयार_

Impact 24 news
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती -: काही महिन्यांपूर्वी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा अर्ज स्वीकारणारे संकेतस्थळ विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अनेक विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज न स्वीकारताच बंद झाले होते. ज्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिले होते.

एकीकडे जागतिक महामारी घोषित *कोरोना कोवीड-19* चे संक्रमन होण्याचा भय तर दुसरी कडे केंद्र शासनाने यावर आळा घालण्याकरिता केलेली *संचारबंदी* हा उपाय. सोबतच दुर्गम भागातील रहिवासी विद्यार्थ्यांकडे प्रचार व प्रसार माध्यमांचा ही असलेला अभाव. अशा परिस्थितीत आता काय करावे, कुठे जावे, कोणाची मदत घ्यावी व आपले परीक्षा अर्ज कसे विद्यापीठापर्यंत पोहोचवून आपले शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून कशे वाचवावे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उद्भवले असता त्यांना साथ मिळाली ती म्हणजे च NSYF राष्ट्रीय विद्यार्थी व युवक आघाडी पूर्वीचे ( National SC ST OBC Student & Youth Front ) ची.

विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या या अडचणी *NSYF चे अमरावती जिल्हाध्यक्ष अक्षय मनवर* यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी त्यावर ताबडतोडब दखल घेत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्यापासून वाचविण्याकरिता विद्यापीठाने किमान 10 दिवसंकरिता तरी पुन्हा एकदा परीक्षा अर्ज स्वीकारावेत अशे विनंती पत्र विद्यापीठाचे कुलगुरू मा. मुरलीधर चांदेकर यांना पाठविले होते. आणि त्यावर दाखल घेत विद्यार्थी हितचिंतक मा. महोदयांनी आता लवकरच ऑनलाइन अथवा ऑफलाईन रित्या परीक्षा अर्ज पुन्हा स्वीकारले जातील, असे प्रसारमाध्यमांद्वारे सुचविले आहे.

अमरावती विद्यापीठाचे परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अर्ज भरण्याकरिता मिळणाऱ्या या संधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे व सोबतच त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू तथा NSYF चे जिल्हाध्यक्ष यांना धन्यवाद देत त्यांचा आभार व्यक्त केला आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here